‘डिजिटल मतदार कार्ड’ येण्यापूर्वी मतदार यादीत आपले नाव तपासताय? ‘ही’ आहे सोपी पद्धत…

'डिजिटल मतदान कार्ड' डाऊनलोड करण्यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये जोडले जाणे आवश्यक आहे. यासाठी मतदार यादीमध्ये आपले नाव तपासणे देखील गरजेचे आहे.

‘डिजिटल मतदार कार्ड’ येण्यापूर्वी मतदार यादीत आपले नाव तपासताय? ‘ही’ आहे सोपी पद्धत...
डिजीटल वोटर कार्ड
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 5:21 PM

मुंबई : डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत सध्या  निवडणूक आयोगकडून मतदार ओळखपत्र डिजिटल करण्याचे काम सुरू आहे. मतदार ओळखपत्र डिजिटल झाल्यानंतर आपण ते आपल्या मोबाईलवर सहजपणे डाउनलोड करू शकतो. मतदार कार्ड डिजिटल झाल्यानंतर, त्यावर आपले रंगीत छायाचित्र देखील दिसणार आहे. त्याचबरोबर मतदार ओळखपत्र डिजिटल झाल्यानंतर त्याची हार्ड कॉपी जवळ बाळगून फिरण्याची आवश्यकता भासणार नाही नाही (How to check your name in voter list by these easy step).

परंतु, ‘डिजिटल मतदान कार्ड’ डाऊनलोड करण्यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये जोडले जाणे आवश्यक आहे. यासाठी मतदार यादीमध्ये आपले नाव तपासणे देखील गरजेचे आहे. आपण ते ऑनलाईन तपासू शकतो. चला तर, आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की, नाही हे कसे तपासावे ते जाणून घेऊया.

असे तपासा आपले नाव…

मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे (https://Electoralsearch.in). त्यानंतर मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी स्वतःचे व वडिलांचे नाव टाकून आपले नाव तपासू शकता. दुसर्‍या टॅबमध्ये आपण आपले नाव एपिकच्या (मतदार ओळखपत्र) संख्येनुसार पाहू शकता. आपण आपल्या व्होटर अर्थात मतदान कार्डमध्ये नवीन माहिती अद्यतनित केली असेल तरच दुसरा टॅब वापरा. त्यानुसार आपल्याकडे एपिक नंबर नसल्यास ‘तपशीलांनुसार शोध घ्या’ वर क्लिक करा (How to check your name in voter list by these easy step).

तपशीलानुसार तपासा

समोर उघडलेल्या टॅबमध्ये प्रथम आपले पूर्ण नाव लिहा. त्यानंतर पुढे आपल्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाईप करा आणि आपले लिंग निवडा. यानंतर आपल्या जन्म तारखेपासून जिल्हा आणि विधानसभा माहिती भरा. यानंतर खाली दिलेल्या बॉक्समध्ये असलेला 5 अंकी कोड अचूक रिकाम्या रकान्यात लिहा. मग, शोध किंवा सर्च या बटणावर क्लिक करा. यानंतर पर्याय आल्यावर आपल्या नावावर क्लिक करा. यानंतर आपल्या नावासमोरील तपशीलावर क्लिक करून आपली माहिती तपासा. संपूर्ण तपशील भरल्यानंतरही मतदार यादीत आपली माहिती दिसत नसेल तर, आपण निवडणूक आयोगाशी टोल फ्री क्रमांक 1800111950 किंवा 1950 वर संपर्क साधू शकता.

(How to check your name in voter list by these easy step)

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.