कॅमेऱ्याची स्वच्छता करताना ‘या’ चुका पडतील महागात; ‘या’ टिप्स फॉलो करा

फोनचा कॅमेरा साफ करताना हळूवारपणे करायला हवा. कारण, तुम्ही अगदी कसाही फोनचा कॅमेरा स्वच्छ केल्यास फोटोची गुणवत्ता घराब होऊ शकते. यासाठी आम्ही खाली काही टिप्स सांगत आहोत, त्या जाणून घ्या.

कॅमेऱ्याची स्वच्छता करताना ‘या’ चुका पडतील महागात; ‘या’ टिप्स फॉलो करा
Smartphone Camera Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 3:16 PM

आता चांगला फोटो काढायचा म्हणजे सर्वप्रथम स्मार्टफोनचा कॅमेरा स्वच्छ असणं आवश्यक आहे. तुम्ही अगदी ऐनवेळी फोटो काढायचा म्हणून कसाही कॅमेरा स्वच्छ केल्यास नुकसान होऊ शकते. धूळ, बोटांचे ठसे आणि इतर घाण कॅमेऱ्याची गुणवत्ता बिघडवू शकते. तुम्हाला तुमच्या फोनचा कॅमेरा सहज कसा स्वच्छ करता येईल, याविषयीच्या टिप्स जाणून घ्या. आजकाल स्मार्टफोनमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा कॅमेरा असतो. युजर्सची पसंती पाहून कंपन्या चांगला कॅमेरा असणारे फोन बाजारात आणतात. विशेष म्हणजे आता स्मार्टफोनचे कॅमेरा डीएसएलआर कॅमेऱ्यांशीही स्पर्धा करतात. ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांना वेगवेगळ्या अँगलमधून फोटो काढायला आवडतात.

स्मार्टफोनमधून उत्तम फोटो काढण्यासाठी स्वच्छ कॅमेरा असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या कॅमेऱ्यावर धूळ, बोटांचे ठसे आणि इतर घाण कॅमेऱ्याची गुणवत्ता बिघडवू शकते. अनेकदा फोनचा कॅमेरा साफ करताना लोक काही चुका करतात. यामुळे कॅमेऱ्याचं खूप नुकसान होतं. चला तर मग तुम्हाला तुमच्या फोनचा कॅमेरा सहज कसा स्वच्छ करता येईल, याविषयीच्या टिप्स पाहुया.

कॅमेरा स्वच्छ करताना ‘या’ गोष्टींचा वापर करा

मायक्रोफायबर कापड: मायक्रोफायबर कापड हा उत्तम पर्याय आहे. हा कपडा मऊ आहे आणि लेन्स स्क्रॅच होण्याचा धोका यानं कमी होतो.

हे सुद्धा वाचा

चष्मा साफ करणारं कापड: हा देखील एक चांगला पर्याय आहे. हवं असेल तर चष्मा साफ करण्यासाठीही कापडाचा वापर करू शकता. लेन्स क्लीनर: कॅमेरा लेन्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लेन्स क्लीनरचा वापर करू शकता.

कॅमेरा स्वच्छ कसा करावा?

मायक्रोफायबर कापडाचा वापर करा: मायक्रोफायबर कापडाच्या हलक्या ओल्या रंगाने लेन्स हळुवारपणे पुसून घ्या. वर्तुळाकार गतीने लेन्स पुसून घ्या.

लेन्स क्लीनर वापरा: जर लेन्स खूप घाणेरडी असेल तर मायक्रोफायबरच्या कापडाला थोडा लेन्स क्लीनर लावून लेन्स साफ करू शकता. लेन्स ब्रश: फोनच्या कॅमेऱ्यावर जमा झालेली धूळ दूर करण्यासाठी तुम्ही लेन्स ब्रशचा वापर करू शकता. हे खूप मऊ आहे. यामुळे लेन्सवर स्क्रॅच येत नाहीत.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.