
अनेकदा असं होतं की तुमच्या फोनचं स्टोरेज फुल भरलेलं असतं आणि त्यात सेव्ह केलेल्या फाईल्स किंवा ॲप्स तुम्हाला डिलीट करायचे नसतात. तुम्हाला माहित आहे का की काही ट्रिक्स वापरून तुम्ही फोनमधील फाईल्स पूर्णपणे डिलीट न करता किंवा ॲप्स अनइन्स्टॉल न करता स्टोरेज फ्री करू शकता. आम्ही तुम्हाला असे मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या फोनचे स्टोरेज सहज खाली होईल आणि काहीही डिलीट करावे लागणार नाही.
अनेक युजर्सना हे माहित नसते की, ते डिव्हाइसमधून ते ॲप्स ऑफलोड करू शकतात, जे फारसे वापरले जात नाहीत. अशावेळी ॲप्स स्टोरेज स्पेसचा वापर करत नाहीत, पण ते डिलीट ही करावे लागत नाहीत. आयफोन युजर्सना सेटिंग्जमध्ये सोपा पर्याय मिळतो, तर काही अँड्रॉइड फोनमध्ये थर्ड पार्टी ॲप्सची मदत घ्यावी लागू शकते.
जर तुम्हाला अँड्रॉइड फोनमध्ये ॲप्स ऑफलोड करण्याचा सोपा पर्याय सापडला नाही तर तुम्ही ॲप कॅश आणि स्टोरेज क्लिअर करू शकता. यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन ॲपवर टॅप करावे लागेल आणि स्टोरेज सेक्शनमध्ये क्लिअर कॅश आणि क्लिअर डेटा सारखे पर्याय मिळतील. याशिवाय क्लीनर ॲप्सच्या माध्यमातून कॅच फाईल्स डिलीट करून स्टोरेज स्पेस मोकळी करता येईल.
लोकप्रिय गुगल फोटोज ॲपचा वापर करून तुम्ही फोनवर क्लिक केलेले किंवा रेकॉर्ड केलेले फोटो किंवा व्हिडिओ गुगलवर सेव्ह करू शकता. गुगल अकाऊंटवर प्रत्येक यूजर्सना १५ जीबी फ्री स्टोरेज मिळते, ज्याचा वापर फोटो किंवा व्हिडिओंचा बॅकअप घेण्यासाठी केला जाऊ शकतो. बॅकअप घेतल्यानंतर फोनमधून डिव्हाइस काढून फ्री-अप स्टोरेजचा पर्याय मिळू शकता.
तुमच्या फाईल्स सेव्ह करण्यासाठी तुम्ही फोनच्या स्टोरेजऐवजी क्लाऊड स्टोरेजची मदत घेऊ शकता. गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स किंवा वनड्राइव्ह सारख्या क्लाऊड स्टोरेज सेवांसह, वापरकर्त्यांना विनामूल्य स्टोरेज मिळते. तुम्ही फोनच्या फाईल्स त्यात ट्रान्सफर करू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा ॲक्सेस करू शकता. त्यामुळे फाईल्स डिलीट कराव्या लागणार नाहीत आणि स्टोरेजही रिकामे राहील.