Happy Raksha Bandhan 2022 : रक्षाबंधनाच्या दिवशी ठेवा स्पेशल स्टेटस, डाऊनलोड करून पाठवा ग्रीटिंग्ज

शुभम कुलकर्णी

|

Updated on: Aug 11, 2022 | 12:45 PM

रक्षाबंधनाच्या दिवशी आपली लाडकी बहिण, भावासाठी स्पेशल शुभेच्या देणारे स्टेटस ठेवू शकत किंवा ग्रीटिंग्ज डाऊनलोड करून मोबाईलवरून पाठवू शकता. इंस्टंट मेसेजिंग ॲपवरून स्टीकर्स, जीआयएफ डाऊनलोड करू शकतात.

Happy Raksha Bandhan 2022 : रक्षाबंधनाच्या दिवशी ठेवा स्पेशल स्टेटस, डाऊनलोड करून पाठवा ग्रीटिंग्ज
राखी स्पेशल स्टिकर्स
Image Credit source: social

मुंबई : आज श्रावण महिन्यातील पौर्णिमा. भारतात आजच्या दिवशी अनेक राज्यांमध्ये रक्षाबंधन (Raksha Bandhan) साजरे केले जाते. हा दिवस म्हणजे बहिण भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव (Festive season) साजरा करणार सण. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या प्रदीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. तर भाऊही आपल्या लाडक्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. खास गोड -धोड पदार्थ, मिठाई बनवून खाल्ली जाते, या सणाचा आनंद लुटला जातो. आजच्या डिजीटल जमान्यात अनेक जण मोबाईल स्टेटसवर आपल्या बहीण अथवा भावाचे फोटो ठेवून किंवा त्यांच्यासाठी एखादा मेसेज अपलोड करून (digital wishes) त्यांच्या प्रती वाटणारे प्रेम व्यक्त करतात. जर तुम्हीही तुमचा भाऊ अथवा बहिणीसाठी राखीचे स्टेटस, स्टीकर, जीआयएफ शोधत (status, stickers, GIFs) असाल, तर त्यासाठी एक सोप्पा उपाय आहे. इंस्टंट मेसेजिंग ॲपवरून युजर्स सहजरित्या स्टीकर्स आणि जीआयएफ (GIFs) डाऊनलोड करू शकतात. नेहमीच्या बोरिंग मेसेजेसेपक्षा हे मेसेज मजेशीर आणि रंगीबेरंगी असतात.

कुठे सापडतील राखी स्पेशल स्टिकर्स ?

तुमच्या मोबाईलमधील गूगल प्ले स्टोअरवर जाऊन सहजरित्या राखी स्टिकर्स शोधू शकता आणि ते डाऊनलोड करू शकता. ते स्टिकर्सचे ॲप तुमच्या स्मार्टफोनमध्ये समाविष्ट करू शकता. गूगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड केल्यावर युजर्सना एक प्रोसेस फॉलो करावी लागेल. ती खालीलप्रमाणे आहे.

रक्षाबंधनानिमित्त स्टिकर्स ॲड करण्यासाठी ही प्रोसेस करा फॉलो :

हे सुद्धा वाचा

स्टिकर्स कसं ॲड करणार?

  • – तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप ओपन करा.
  • – त्यामध्ये एखाद्या चॅट विंडोमध्ये जाऊन स्माईलीच्या आयकॉनवर क्लिक करावे.
  • – तिथे तीन पर्याय दिसतील, त्यामध्ये अधिक (plus) चे एक चिन्ह असेल, त्यावर क्लिक करावे.
  • – त्यानंतर ॲप्सची यादी खाली स्क्रोल करा आणि खालच्या बाजूस गेट मोअर (get more) चा ऑप्शन दिसेल.
  • – त्यानंतर युजर्स गूगल प्ले स्टोअरवर जातील, जिथे WAStickers Apps ॲक्सेस करता येऊ शकते.
  • – त्यानंतर सर्च बारमध्ये रक्षा बंधन ॲप्स सर्च करा आणि डाऊनलोडच्या पर्यायावर क्लिक करावे.
  • – त्यानंतर माय स्टिकर टॅबवर क्लिक करावे. युजर्स व्हॉट्सॲप पॅक पाहू शकतात.
  • – त्यानंतर तुम्ही तुमचा बहीण अथवा भाऊ यांना स्टिकर्स पाठवून रक्षा बंधनानिमित्त विशेष शुभेच्छा देऊ शकता.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI