न बोले तुम ना मैने कुछ कहाँ…. फोनमधून आवाज येत नाही ना ऐकू जातो ? काही क्षणात असा दूर करा हा प्रॉब्लेम

मोबाईल हा आज सर्वांच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग किंवा असं म्हणा ना अविभाज्य अंगच झाला आहे. दुसऱ्यांशी बोलण्यासाठी मुख्यत्वे त्याचा उपयोग होतो, पण जेव्हा याच मोबाईलमध्ये काही एरर मुळे समोरच्याला आपला आवाज येत नाही किंवा आपल्याला समोरचा काय बोलत ऐकूच येत नाही, तेव्हा प्रॉब्लेम होतो.

न बोले तुम ना मैने कुछ कहाँ.... फोनमधून आवाज येत नाही ना ऐकू जातो ? काही क्षणात असा दूर करा हा प्रॉब्लेम
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 8:39 AM

नवी दिल्ली : आजच्या काळात मोबाईल फोन (mobile) हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा भाग बनला आहे. शरीराचा एखादं अविभाज्य भाग असावा, अशा रितीने मोबाईलला माणसं चिकटलेली असतात. आपल्या अर्ध्याहून अधिक कामासाठी फोनचा आधार घेतो. कोणाला फोन करायचा असो किंवा मग चॅटिंग असो, आजकाल तर किराणापासून ते कपड्यापर्यंत सर्व गोष्टी ऑनलाइन खरेदी (online) करता येतात, अनेकजण मोबाईलवरून ते ऑर्डरही करत असतात. बँकेचे (bank) व्यवहारही करता येतात, थोडक्यात सर्व गोष्टींसाठी माणूस आजकाल मोबाईलवर अवलंबून असतो.

पण कितीही झालं तरी ते यंत्र आहे, कधीतरी बिघडू शकतं. अशावेळी मोबाईलवर अवलंबून असलेले आपण हवालदिल होतो. काही वेळा मोबाईल फोनमध्ये अशा समस्या उद्भवतात, ज्यामुळे आपल्याला फोनवर कॉल येऊ शकत नाही ना आपण कोणाला कॉल करू शकतो. कधीकधी समोरच्याला आपला तर कधी आपल्याला समोरच्या व्यक्तीचा आवाजही ऐकू येत नाही. मग अशावेळी आपण पॅनिक होतो, लगेच मोबाईलच्या दुकानात धाव घेतो. पण रात्री- अपरात्री अशी समस्या उद्भवली तर काय करायचं. अशा वेळी काही सोप्या टिप्स फॉलो करून ही समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. त्या टिप्स कोणत्या हे जाणून घेऊया.

मोबाईल फोन रिबूट करा

हे सुद्धा वाचा

जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर कॉल्स रिसिव्ह करू शकत नसाल, तर तुमच्या फोनमध्ये काही किरकोळ समस्या येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, ही समस्या टाळण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही तुमचा फोन रिबूट किंवा रिस्टार्ट करावा. रिबूट केल्याने फोनच्या सर्व सेवा बंद होतात. असे केल्याने, तुमचा फोन सर्व सेवा रीलोड करण्यात मदत करतो आणि सर्व ॲप्स रिफ्रेश होतात.

फ्लाइट मोड ऑन/ऑफ करा

रिबूट किंवा रिस्टार्ट करूनही तुमच्या मोबाइल फोनची समस्या दूर होत नसेल, तर तुमच्या फोनमधील फ्लाइट मोड चालू करा, त्यानंतर फ्लाइट मोड बंद करा. फ्लाइट मोड ऑन-ऑफ केल्याने तुमचा फोन सेल्युलर नेटवर्कवरून डिस्कनेक्ट होतो. अशा वेळी फोनची ही समस्या दूर होते आणि तुम्ही फोनमधील सर्व कॉल्स रिसिव्ह करू शकता.

नेटवर्कचा प्रॉब्लेम

मोबाईलच्या समस्येमुळे अस्वस्थ होण्यापूर्वी, तुम्ही नेटवर्क कव्हरेज क्षेत्रात आहात की नाही हे एकदा तपासा. इनकमिंग कॉल्स प्राप्त करण्यासाठी आणि एखाद्याला कॉल करण्यासाठी, तुमचा फोन कव्हरेज क्षेत्रात असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नेटवर्क कव्हरेज क्षेत्रात नसाल तर तुम्ही कोणाला कॉल करू शकत नाही आणि कोणाचा कॉल रिसिव्हही करू शकत नाही.

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.