देशातील पहिली CNG मोटारसायकल लॉन्चची तयारी, 1Kg मध्ये किती Km जाणार अन् किंमत

| Updated on: Apr 16, 2024 | 7:11 AM

cng motorcycle: या गाडीला 17-इंच चाके आणि दोन्ही टोकांना 80/100 ट्यूबलेस टायर असण्याची शक्यता आहे. फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम कॉम्बो कॉम्बिनेशनसह असणार आहे. सस्पेंशन सेटअपमध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक युनिट असेल.

देशातील पहिली CNG मोटारसायकल लॉन्चची तयारी, 1Kg मध्ये किती Km जाणार अन् किंमत
Follow us on

देशातील पहिली सीएनजी (CNG ) मोटारसायकल लॉन्चची तयारी पूर्ण झाली आहे. येत्या जून महिन्यात ही मोटारसायकल बाजारात येणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी म्हटले आहे. ही मोटारसायकल बजाज कंपनीकडून तयार केली गेली आहे. सीएनजीवर असणारी ही मोटारसायकल भारतीय वाहन बाजारात नवीन क्रांती घडवणार आहे. कारण पेट्रोलपेक्षा सीएनजीची किंमत कमी असते. त्यामुळे ही गाडी चांगलीच यशस्वी ठरणार आहे.

काय आहेत CNG मोटारसायकलचे फिचर्स

बजाजकडे प्लॅटिना आणि CT मोटारसायकल सर्वाधिक मायलेज देणाऱ्या गाड्या आहेत. त्यापेक्षाही जास्त सीएनजी गाडीचे मायलेज असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये110cc चे इंजिन लावण्याची शक्यता आहे. यापूर्वी बजाजच्या प्लॅटिना गाडीत 110cc आणि CT 110X इंजिन होते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडले जाणार आहे.

किती देणार मायलेज

बजाजच्या या सीएनजी मोटारसायकलला बायो-इंधन सेटअप मिळणार आहे. या बाइकमध्ये एक डेडिकेटेड स्विच मिळण्याची शक्यता आहे. यामुळे CNG वरून पेट्रोल किंवा पेट्रोलवरून CNG वर स्विच करता येईल. सीएनजी टाकी सीटच्या खाली असेल, तर पेट्रोलची टाकी सामान्य स्थितीत असेल. एकूणच, बजाजच्या सीएनजी मोटरसायकलचा हा दर्जा अधिक चांगला असणार आहे. एक किलो CNG मध्ये ही बाईक 100 ते 120 Km मायलेज देऊ शकते.

हे सुद्धा वाचा

बजाज ईव्ही, इथेनॉल, एलपीजी आणि सीएनजी गाड्यांवर भर देत आहे. एका वर्षात सुमारे 1 ते 1.20 लाख CNG बाइक्सचे उत्पादन करणार आहे. या गाड्यांची किंमत सुमारे एक लाख रुपये असण्याची शक्यता आहे. सीएनजी मोटारसायकलचे उत्पादन संभाजीनगरमधील प्लँटमध्ये केले जात आहे.

या गाडीला 17-इंच चाके आणि दोन्ही टोकांना 80/100 ट्यूबलेस टायर असण्याची शक्यता आहे. फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम कॉम्बो कॉम्बिनेशनसह असणार आहे. सस्पेंशन सेटअपमध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक युनिट असेल. त्याचे एबीएस आणि नॉन-एबीएस व्हेरिएंट दोन्ही ऑफर केले जाऊ शकतात. CNG मोटरसायकलला गीअर इंडिकेटर, गियर मार्गदर्शन आणि ABS इंडिकेटर यासारखे फिचर्स असणार आहे.