मोबाइल डेटा स्पीडच्या बाबतीत भारत पाकिस्तान आणि नेपाळच्याही मागे

जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त दरात मोबाईल डेटा मिळतो. परंतु या मोबाईल डेटाच्या स्पीडच्या बाबतीत भारत खूपच मागे असल्याचे निदर्शनास आले आहे.

मोबाइल डेटा स्पीडच्या बाबतीत भारत पाकिस्तान आणि नेपाळच्याही मागे
भारतात सॅटेलाईट संचार सेवा प्रसाराची तयारी

मुंबई : संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त दरात मोबाईल डेटा मिळतो. परंतु या मोबाईल डेटाच्या स्पीडच्या बाबतीत भारत खूपच मागे असल्याचे काही रिपोर्ट्स समोर आले आहेत. मोबाईल डेटा स्पीड लिस्टमध्ये भारत जगात 131 व्या स्थानावर आहे. या लिस्टमध्ये श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान हे देश भारताच्या पुढे आहेत. (India left behind Pakistan and Nepal in global mobile data index with ranked 131 in reports)

भारतातील सरासरी डेटा स्पीड

डेटा स्पीड ट्रॅक करणारी कंपनी Ookla च्या Speedtest Global Index सप्टेंबर 2020 च्या रिपोर्टनुसार भारतात सरासरी मोबाइल डाऊनलोड स्पीड हा 12.07Mbps इतका आहे आणि अपलोड स्पीड 4.32 Mbps आहे. तर लेटेन्सी रेट 52ms इतका आहे. जगभरातील सरासरी मोबाईल डेटा स्पीड हा 35.26 Mbps (डाऊनलोड स्पीड) इतका आहे, अपलोड स्पीड 11.22 Mbps आणि लेटेन्सी रेट 42ms इतका आहे.

अनेक देश भारताच्या पुढे

ग्लोबल मोबाइल डेटा स्पीड चार्टमध्ये नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश भारताच्या खूप पुढे आहेत. नेपाल या चार्टमध्ये 117 व्या, पाकिस्तान 116 व्या, श्रीलंका 102 व्या स्थानावर आहेत. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील सरासरी डेटा स्पीड 17Mbps पेक्षा जास्त आहे.

ब्रॉडबँडच्या बाबतीत भारताची स्थिती बरी

फिक्स्ड लाइन ब्रॉडबँडच्या बाबतीत भारताची स्थिती थोडी बरी आहे. या लिस्टमध्ये भारत 70 व्या क्रमांकावर आहे. यामध्ये भारतात सरासरी 46.47Mbps डाऊनलोड स्पीड, 42.43Mbps अपलोड स्पीड मिळतो, तर लेटेन्सी रेट 18ms इतका आहे. परंतु या लिस्टमध्येदेखील घाना, मोलडोव्हा आणि मालटासारखे देश भारताच्या पुढे आहेत.

दक्षिण कोरिया नंबर एकवर

मोबाइल डेटा स्पीडच्या बाबतीत दक्षिण कोरिया हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण कोरियामध्ये डाऊनलोड स्पीड 121Mbps, सरासरी अपलोड स्पीड 18.81Mbps आणि लेटेन्सी रेट 34ms इतका आहे. फिक्सड लाइन ब्रॉडबँडच्या बाबतीत दक्षिण कोरिया 14 व्या स्थानी आहे. यात द. कोरियात 155.39Mbps डाऊनलोड स्पीड आणि 147.89Mbps इतका सरासरी अपलोड स्पीड मिळतो. तर तिथला लेटेन्सी रेट 22ms इतका आहे.

संबंधित बातम्या

भारतीयांना Boycott China चा विसर, एका आठवड्यात Xiaomi च्या 50 लाख स्मार्टफोन्सची रेकॉर्डब्रेक विक्री

भारतात iPhone 12, iPhone 12 Pro साठी प्री-बुकिंग सुरु, Apple ने ऑफर्सचा पेटारा उघडला

iPhone 12 घेताय? थोडं थांबा, कारण डुअल सिम मोडवर 5G चालणार नाही!

सणासुदीच्या मुहूर्तावर Gionee चा बजेट स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त 5499 रुपये, जाणून घ्या फिचर्स

‘मेड इन इंडिया’चा नारा देत Micromax भारतीय बाजारात पुनरागमन करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

iPhone च्या चाहत्यांसाठी खूशखबर! ‘या’ तीन स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात

Samsung Galaxy M31 Prime भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S20 FE चं प्री-बुकिंग सुरु, आठ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स

(India left behind Pakistan and Nepal in global mobile data index with ranked 131 in reports)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI