Smart TV : 14 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतोय 42 इंचचा स्मार्ट टिव्ही, घराला बनवेल थिअटर
इन्फिनिक्स Y1 TV मध्ये 43-इंचाचा फुल HD LED डिस्प्ले आहे, जो (1920x1080 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले 300 nits ब्राइटनेस आणि 178 डिग्री व्ह्यूइंग अँगलला सपोर्ट करतो.

मुंबई : जर तुम्ही कमी किमतीत मोठा स्क्रीन असलेला स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर कमी किमतीत इन्फिनिक्स Y1 (Infinix Y1) 43 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी मिळत आहे. हा टीव्ही जवळपास निम्म्या किमतीत खरेदी करता येईल.इन्फिनिक्स Y1 43 स्मार्ट टीव्हीची किंमत 24,999 रुपये आहे, परंतु ऑफर अंतर्गत तो 14 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. चला जाणून घेऊया सर्व ऑफर्स आणि सवलतींबद्दल.
इन्फिनिक्स Y1 43 इंच स्मार्ट टीव्हीवर ऑफर
इन्फिनिक्स स्मार्ट टिव्हीची किंमत 24,999 रुपये आहे, पण तो फ्लिपकार्टवर 38 टक्के सूटसह 15,499 रुपयांना सूचीबद्ध आहे. त्याच वेळी, टीव्हीसह HDFC बँक डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1,250 रुपयांची सूट उपलब्ध आहे.
इतकेच नाही तर टीव्हीच्या खरेदीवर 10 टक्के (जास्तीत जास्त रु. 1,250) सूट देखील ICICI बँक आणि कोटक बँक क्रेडिट कार्डांवर उपलब्ध आहे. त्याच वेळी, टीव्हीच्या खरेदीवर 7,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. याचा अर्थ तुम्ही एक्सचेंज ऑफरसह अधिक बचत करू शकता.
इन्फिनिक्स Y1 43 इंच स्मार्ट टीव्हीचे तपशील
इन्फिनिक्स Y1 TV मध्ये 43-इंचाचा फुल HD LED डिस्प्ले आहे, जो (1920×1080 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले 300 nits ब्राइटनेस आणि 178 डिग्री व्ह्यूइंग अँगलला सपोर्ट करतो.
इन्फिनिक्स Y1 43 इंचाचा स्मार्ट टीव्ही प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स आणि YouTube सारख्या अॅप्सना देखील सपोर्ट करतो. इन्फिनिक्स स्मार्ट TV मध्ये डॉल्बी ऑडिओ आणि 20W साउंड आउटपुटसाठी देखील सपोर्ट आहे. इन्फिनिक्सचा स्मार्ट टीव्ही मोबाईलसोबतच लॅपटॉप आणि पीसीला जोडता येतो.
