AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Instagram ने फोटोसाठी 3:4 आस्पेक्ट रेशोचं सपोर्ट जोडलं, जाणून घ्या हे कसं काम करतं ?

इंस्टाग्रामने आपल्या फोटो शेअरिंग अनुभवात एक महत्त्वाचा बदल करत आता वापरकर्त्यांना 3:4 आस्पेक्ट रेशोमध्ये फोटो शेअर करण्याची सुविधा दिली आहे. चला तर मग, जाणून घेऊया हा नवा रेशो नेमका कसा काम करतो.

Instagram ने फोटोसाठी 3:4 आस्पेक्ट रेशोचं सपोर्ट जोडलं, जाणून घ्या हे कसं काम करतं ?
InstagramImage Credit source: Tv9 Bharatvarsh
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jul 22, 2025 | 2:35 PM
Share

इंस्टाग्रामनं आपल्या युजर्ससाठी एक नवा आणि उपयोगी अपडेट आणला आहे. या अपडेटमुळे आता युजर्स 3:4 या आस्पेक्ट रेशियोमध्ये फोटो अपलोड करू शकतील, तेही कोणतीही क्रॉपिंग न करता. यामुळे इंस्टाग्रामवर फोटो शेअर करणं अधिक सोपं आणि ओरिजिनल स्वरूपात शक्य होणार आहे.

सध्या जगातील बहुतांश स्मार्टफोन्समध्ये डिफॉल्ट कॅमेरा रेशियो 3:4 असतो. पण आतापर्यंत इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करताना हा रेशियो स्वीकारला जात नव्हता. त्यामुळे युजर्सना फोटो क्रॉप करावा लागत असे किंवा इमेज क्वालिटी खराब होत असे. परंतु आता हा बदल युजर्ससाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

इंस्टाग्रामचे सीईओ अ‍ॅडम मोसेरी यांनी Threads या अ‍ॅपवरून ही घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, “जे युजर्स 3:4 रेशियोमध्ये फोटो काढतात आणि पोस्ट करतात, त्यांच्या फोटोंचा ओरिजिनल लुक आता कायम राहील.” याचा अर्थ असा की, युजर्स जसे फोटो काढतात, तसेच ते Instagram वर दिसतील. या अपडेटचा फायदा सिंगल इमेज पोस्ट आणि मल्टी-इमेज कॅरोसेल दोन्हींना मिळणार आहे.

याआधी Instagram फक्त स्क्वेअर (1:1) आणि थोडे लांबट (5:4 किंवा 4:5) इमेजेससाठी सपोर्ट देत होता. त्यामुळे अनेक युजर्सना फोटो एडिट करावा लागत होता. पण आता ओरिजिनल क्वालिटी आणि फ्रेमिंगसह फोटो अपलोड करता येतील. यामुळे कंटेंट क्रिएटर्सना आपला मजकूर, ब्रँडिंग किंवा क्रिएटिव्ह व्हिज्युअल्स अधिक नेमकेपणानं सादर करता येणार आहेत.

फक्त इतकंच नाही, तर इंस्टाग्रामने ‘Blend’ नावाचं एक नविन फीचरही सुरू केलं आहे. हे फीचर तुमच्या चॅटमधून रिकमेंडेड Reels दाखवतं आणि सध्या इन्व्हाइट-ओन्ली फीडवर उपलब्ध आहे. Blend फीचर युजर्सच्या Instagram अ‍ॅक्टिव्हिटीच्या आधारावर पर्सनलाइज्ड कंटेंट दाखवतं, जे तुमच्या आवडीनुसार असतं. सध्या हे फीचर iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी सुरू करण्यात आलं आहे.

याशिवाय, गेल्या महिन्यात इंस्टाग्रामने ‘Edits’ नावाचा स्वतंत्र अ‍ॅप सुद्धा लाँच केला होता. हा अ‍ॅप विशेषतः व्हिडिओ एडिटिंगसाठी आहे आणि तो ByteDance च्या लोकप्रिय CapCut अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी आणला गेला आहे. या अ‍ॅपद्वारे युजर्स वॉटरमार्कशिवाय कंटेंट एडिट करून इतर अ‍ॅप्सवर अपलोड करू शकतात.

थोडक्यात सांगायचं झालं तर, Instagram आता केवळ एक फोटो शेअरिंग अ‍ॅप न राहता, युजर्सच्या अनुभवाला अधिक सर्जनशील आणि सहज बनवत आहे. 3:4 रेशियोसारख्या अपडेटमुळे वापरकर्त्यांना ओरिजिनल फोटोज सादर करता येतील आणि Blend फीचरमुळे कंटेंटचा आनंद अधिक वैयक्तिक पातळीवर घेता येईल. Instagram वर काम करणाऱ्या क्रिएटर्ससाठी हे नक्कीच एक गेम चेंजर अपडेट ठरेल.

Follow Us
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा