
आजकाल प्रत्येकजण मनोरंजनासाठी सोशल मिडियावर खूप सक्रिय असतात. अशात इंस्टाग्राम हे खूप लोकप्रिय अॅप आहे. कारण इंस्टाग्राम हे केवळ रील्ससाठीच नाही तर इतर अनेक कारणांमुळे लोकांची पसंती आहे. 2025 मध्ये जगभरात इंस्टाग्रामचे 2 अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. त्याच वेळी भारतात इन्स्टाग्रामचे 414 दशलक्ष वापरकर्ते आहेत. अर्थात लाखो वापरकर्ते केवळ रील्स किंवा पोस्टसाठीच नव्हे तर इतर अनेक कारणांसाठी देखील त्याच्याशी जोडलेले आहेत. प्लॅटफॉर्मवर, तुम्ही जगभरातील लोकांशी कनेक्ट होऊ शकता, तुमच्या मित्रांशी आणि कुटुंबाशी कनेक्ट राहू शकता, इतकेच नाही तर कंटाळा आल्यावर तुम्ही मोफत गेम देखील खेळू शकता.
हो, तुम्हाला आता इंस्टाग्रामवर मोफत गेम खेळता येणार आहे. चला तर मग आजच्या या लेखात तुम्ही इंस्टाग्रामवर गेम कसा खेळायचा याबद्दल जाणून घेऊयात…
इंस्टाग्रामवर गेम खेळण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. तसेच तुम्हाला फोनमध्ये कोणताही थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल करावा लागणार नाही. तुम्ही घरी किंवा फोनवर कुठेही हवे तेव्हा खेळायला सुरुवात करू शकता. येथे आम्ही तुम्हाला हा गेम कसा खेळायचा हे सांगणार आहोत.
इंस्टाग्रामवर गेम खेळण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त इंस्टाग्राम ॲप उघडा. यानंतर कोणत्याही व्यक्तीच्या चॅट सेक्शनमध्ये जा. तुम्ही तुमच्या स्वतःच्या चॅटमध्ये देखील जाऊ शकता.
यानंतर चॅट सेक्शन उघडेल. आता कोणताही एक इमोजी निवडा आणि तो पाठवा. पाठवल्यानंतर तो इमोजी काही सेकंदांसाठी दाबा. असे केल्याने तुम्ही गेममध्ये पोहोचाल.
तुमचा खेळ सुरू होईल. तुम्ही निवडलेला इमोजी मैदानात उड्या मारताना दिसेल. तुम्हाला फक्त खात्री करावी लागेल की तो जमिनीला स्पर्श झाला नाही पाहिजे. यासाठी तुम्ही तळाशी दिलेल्या स्लायडरने इमोजी मुव्ह करू शकता आणि अशारितीने हा गेम खेळू शकता . तुम्ही तो स्लायडर उजवीकडे-डावीकडे मुव्ह करू शकता.