
iPhone Discount : आपल्याकडे महागडा अॅपलचा फोन असायला हवा, असे प्रत्येकालाच वाटते. खरं म्हणजे या फोनमधील सुविधा इतर फोनच्या तुलनेत चांगल्या असतात म्हणूनही अनेकांना हा फोन आवडतो. अॅपल कंपनी फक्त फोनच तयार करत नाही तर या कंपनीकडून हेडफोन, कॉम्यूटर, लॅपटॉप, टॅब, स्मार्टवॉच अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर आधारलेल्या गॅझेट्सची निर्मिती केली जाते. अॅपल कंपनीची उत्पादने उच्च दर्जाची असतात. म्हणूनच ती महागडी असतात. अनेकांना तर अॅपल कंपनीचे फोन, मॅकबुक खरेदी करणेही शक्य होत नाही. परंतु आता अनेकाचे अॅपल फोनचे, मॅकबुकचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण आता आयफोन, स्मार्टवॉच, मॅकबुकवर जवळपास 10000 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट दिले जात आहे.
तुम्हाला अॅपलचा फोन, मॅकबुक खरेदी करायचा असेल तर सध्या काही भन्नाट ऑफर चालू आहेत. अॅपलने जगभरातील बाजाराती या ऑफर लागू केल्या आहेत. या ऑफर्सचा लाभ घेत तुम्हाला मॅकबुक एअर, लेटेस्ट आयफोन खरेदी करता येईल. त्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिलू शकेल. अॅपल कंपनीने आपल्या डिव्हाईसची मूळ किंमत कमी केलेली नाही. परंतु या उपकरणांची खरेदी करताना तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत. या ऑफरच्या माध्यमातून तुमचे जवळपास 10 हजार रुपये वाचू शकतात.
अॅपल कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर 13 इंची मॅकबुक एअर एम 4 हे उपकरण 10 हजार रुपयांच्या इन्स्टंट डिस्काऊंटसह 89900 रुपयांना विकले जात आहे. आयसीआयसीआय, अॅक्सिस, अमेरिकन एक्स्प्रेस कार्डवर ही ऑफर लागू आहे. हीच ऑफर 14 आणि 16 इंची मॅकबुक प्रो मॉडेल्सवरही लागू हे. ही मॉडेल्स अनुक्रमे 1,59,900 रुपये आणि 2,39,900 रुपयांना विकली जात आहेत.
तुम्हाला आयफोन 17 खरेदी करायची असेल तर ही एक चांगली संधी असू शकतो. आयफोन 17 वर तुम्हाला फक्त 1000 रुपयांची सुट मिळत आहे. या आयफोनची बाजारात सर्वाधिक मागणी आहे. अनेक प्लॅटफॉर्म्सवर हा फोन आऊट ऑफ स्टॉक आहे. आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस या फोनवर तुम्हाला रेट कटसह 4000 रुपयांचे कॅशबॅक मिळत आहे.