Apple ची मोठी तयारी, या उत्पादनांची करणार घोषणा, पाहा काय आहे योजना ?
साल 2025 संपत आहे आणि एप्पल कंपनीचा नवीन वर्ष 2026 संदर्भात मोठा प्लान आहे. नव्या वर्षात कंपनी स्वस्त उत्पादने लाँच करु शकते असे म्हटले जात आहे.

Apple नवीन वर्षात एण्ट्री लेव्हल उत्पादन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे वर्ष संपत आले असून नवीन वर्षात २०२६ मध्ये सुरुवातीला Apple कंपनीच काही एण्ट्री लेव्हल उत्पादने लाँच करण्याची शक्यता आहे. यात एक बजेट फ्रेंडली MacBook असणार असून तो A-सीरीजच्या प्रोसेसर लाँच होऊ शकतो. या शिवाय ब्रँड iPhone 16e चा सक्सेसर म्हणजे iPhone 17e वर देखील काम सुरु आहे, तो A18 प्रोसेसरसह लाँच होऊ शकतो.
केव्हा लाँच होणार एप्पलचे स्वस्तातील प्रोडक्ट ?
MacRumors च्या बातमीनुसार Apple चे नवीन एण्ट्री लेव्हलचे मॉडेल्सना iPhone, iPad आणि Mac लाईनअपमध्ये पुढच्या वर्षी लाँच करु शकतो. iPhone 17e ला कंपनी स्प्रिंग 2026 मध्ये लाँच करु शकते. याच सोबत कंपनी 12th जेन iPad आणि स्वस्तातला MacBook लाँच करु शकतो.
अपकमिंग एण्ट्री लेव्हल मॅकबुकमध्ये A18 Pro प्रोसेसर असणार आहे. या प्रोसेसरला iPhone 16 Pro सिरीजसह लाँच करण्यात आले होते. यात 13-inch चा डिस्प्ले देण्यात आला आहे.कंपनी या डिव्हाईसला ब्लू, पिंक, सिल्व्हर आणि यलो कलरमध्ये लाँच करु शकते.
किती असणार किंमत?
या मॅकबुकची किंमत 699 डॉलर ( सुमारे 62 हजार रुपये ) ते 899 डॉलर (सुमारे 80 हजार रुपये) दरम्यान असू शकते. Apple बजेट मॅकबुकमध्ये जुन्या डिझाईन आणि डिस्प्ले पार्ट्सचा वापर करु शकतो. यात 8GB RAM आणि केवळ एक Type-C पोर्ट दिला जाऊ शकतो.
तसेच iPhone 17e मध्ये कंपनी Apple चा A19 प्रोसेसर देऊ शकते. यात 18MP चा फ्रंट कॅमरा आणि Apple चा C1 मॉडेम मिळतो. फोनच्या डिझाईनमध्ये जास्त बदल पाहायला मिळणार नाही. तसेच 12th जेन iPad मध्ये कंपनी A18 प्रोसेसर देऊ शकते, हा डिव्हाईस एप्पल इंटेलिजन्स सपोर्टसह येऊ शकतो.
