Realme Neo 8 मध्ये पॉवरफूल जंबो बॅटरी, या प्रोसेसरसह होणार धमाकेदार एण्ट्री !
Realme Neo 8 लवकरच मोठ्या अपग्रेडसह लाँच होऊ शकतो. अलिकडेच याची डिटेल्स लिक झाले असून त्यानुसार या फोनचा प्रोसेसर, बॅटरी आणि कॅमेरा संबंधिचे डिटेल्स माहिती झाले आहेत. चला तर पाहूयात काय आहेत डिटेल्स ?

चीनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Weibo वर एका पोस्ट मध्ये टिपस्टर Digital Chat Station ने Realme Neo 8 या आगामी स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन लिक केले आहेत.Gizmochina च्या बातमीनुसार हा फोन क्वालकॉमच्या कथित स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 5 चिपसेट आणि 8000mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरीसह लाँच होऊ शकतो.या फोनमध्ये 1.5K रिझॉल्यूशन सह 6.78 इंच LTPS फ्लॅट डिस्प्ले, सिक्युरिटीसाठी 3 डी अल्ट्रासॉनिक फिंगप्रिंट सेंसर आणि फोनच्या मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर दिलेला आहे.
वर सांगितल्यानुसार Realme Neo 8 गेल्या वर्षी लाँच झालेल्या Realme Neo 7चे अपग्रेड व्हर्जन असू शकतो. रिअलमी निओ 7 च्या 12 जीबी/256 जीबी बेस व्हेरिएंटला 2099 चीनी युआन ( सुमारे 6,000 रुपये ) आणि 16GB/1 टीबीच्या टॉप व्हेरिएंटला 3299 चीनी युआन ( सुमारे 41,000 रुपये ) मध्ये उतरले होते.
Realme Neo 7 Features
या फोनमध्ये 6.78 इंचाचा 8T LTPO डिस्प्ले असून त्याचे रिझॉल्यूशन 1.5K आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट, 2600Hz टच सँपलिंग रेट, 6000nits पिक ब्रायटनेस सह येतो. या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 9300 प्लस ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंतच्या स्टोरेजसह येतो. आणि यात 12GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळत आहे.
येथे पाहा पोस्ट –
realme Neo 8 Possible Upgrades
— Snapdragon 8 Gen 5/ Dimensity 9500e — 1.5K LTPS Display — Around 8000mAH Battery — 3D UltraSonic Fingerprint Scanner & more…..
It is expected to launch this year in China. pic.twitter.com/5XPuW2sFu7
— Muhammad Anas (@AnasAurum) November 3, 2025
कॅमेरचा विचार करायचा झाला तर Realme Neo 7 मध्ये दोन रिअर कॅमेरे आहेत. 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमरा सेंसर आणि 8 मेगापिक्सल सेकेंडरी वाईड एंगल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळत आहे. आणि हा फोन सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहे. 7000mAh बॅटरी क्षमतेसह आलेल्या या हँडसेटमध्ये 80 वॅटचा वायर्ड चार्ज सपोर्ट मिळत आहे.
