AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 18 Pro : आयफोन 18 सिरीज कधी लॉन्च होणार? फीचर्स काय, किंमत किती?

iPhone 18 Pro : आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मध्ये काय नवीन बदल पहायला मिळणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागलेला आहे. अशातच आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

iPhone 18 Pro : आयफोन 18 सिरीज कधी लॉन्च होणार? फीचर्स काय, किंमत किती?
Iphone PhotoImage Credit source: asherdipps
| Updated on: Feb 21, 2026 | 3:42 PM
Share

Apple आयफोनची संपूर्ण जगात क्रेझ आहे. जगभरात या फोनचे युजर्स आहेत. अशातच आता या आयफोन 18 बाबत महत्त्वाची माहिती लीक झाली आहे. आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max मध्ये काय नवीन बदल पहायला मिळणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागलेला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आगामी फोनमध्ये कंपनी मोठ्या डिझाइन बदल करण्यापेक्षा परफॉर्मन्स आणि कॅमेरा क्वालिटीवर अधिक लक्ष देणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी आयफोन सिरीज अधिक शक्तिशाली असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये काय फीचर्स असू शकतात आणि त्याची किंमत किती असू शकते याची माहिती जाणून घेऊयात.

डिस्प्ले आणि डिझाइन कशी असेल?

लीक्समधील माहितीनुसार, iPhone 18 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्टसह 6.3-इंचाचा OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. तर iPhone 18 Pro Max मध्ये मोठा 6.9-इंचाचा OLED पॅनेल असू शकतो. दोन्ही मॉडेल्ससाठी हाय ब्राइटनेस सुमारे 3000 nits पर्यंत असू शकतो. मात्र डिझाईनमध्ये फार मोठे बदल असण्याची शक्यता नाही. मात्र तरीही डिझाईनची क्वालिटी आणखी सुधारण्यावर कंपनीचा भर असण्याची शक्यता आहे.

परफॉर्मन्स आणि स्टोरेजमध्ये अपग्रेड

आयफोन 18 प्रो सिरीजमध्ये A20 Pro चिपसेट असण्याची अपेक्षा आहे. ही चिप केवळ रॉ पॉवरवरच नव्हे तर अपडेटेड परफॉर्मन्साठी देखील महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. लीकनुसार दोन्ही फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 1 टीबी स्टोरेज पर्याय मिळण्याची शक्यता आहे. रॅममध्ये देखील अपग्रेड मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मल्टीटास्किंग आणि हाय-एंड गेमिंग पूर्वीपेक्षा खूपच स्मूथ होऊ शकते.

कॅमेऱ्यामध्ये काय बदल असणार?

आगामी आयफोन सिरीजमध्ये अॅपल मोठ्या हार्डवेअर बदलांऐवजी इमेज प्रोसेसिंग क्वालिटीवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. अहवालांनुसार प्रो मॉडेलमध्ये अपडेटेड झूम फीचर्ससह 48 एमपीचा प्रायमली कॅमेरा असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 18 एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. कंपनी सॉफ्टवेअर ट्यूनिंगद्वारे फोटोची गुणवत्ता आणखी सुधारण्याच्या धोरणावर काम करत असल्याचे समोर आले आहे.

लाँच तारीख आणि किंमत

समोर आलेल्या माहितीनुसार आयफोन 18 प्रो सिरीज 3 ते 9 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. यावेळी कॉफी ब्राउन, Burgundy आणि डीप पर्पल सारखे नवीन रंग पर्याय मिळण्याची शक्यता आहे. भारतात आयफोन 18 प्रोची किंमत सुमारे 1,39,900 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर प्रो मॅक्सची किंमत सुमारे 1,59,900 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे किंमत कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.
भाजप- संघाला कुठलाही धोका नाही; सुरक्षा घेऊन... संजय राऊतांचा घणाघात
भाजप- संघाला कुठलाही धोका नाही; सुरक्षा घेऊन... संजय राऊतांचा घणाघात.
सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट राज ठाकरे यांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांनाही एक्सपायरी डेट राज ठाकरे यांचा हल्लाबोल.
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले
ज्यांनी विरोध केला त्यांनी व्याख्यानाला यावे;अमोल कोल्हे स्पष्टच बोलले.
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात
शेतकरी संतापला! थेट ट्रॅक्टरभर मका जिल्हाधिकारी कार्यालयात.