iPhone सारखा लूक, दमदार बॅटरी, 7 हजारात बेस्ट राहील का हा फोन?

Tecno Pop 8 | टेक्नोने बाजारात केवळ 7 हजार रुपयांमध्ये स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणला आहे. बजेट सेगमेंटमध्ये कंपनीने काही नवीन फीचर्ससह ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा स्मार्टफोन हुबेहुब iPhone सारखा दिसतो. जाणून घ्या या फोनची बॅटरी आणि इतर फीचरची माहिती?

iPhone सारखा लूक, दमदार बॅटरी, 7 हजारात बेस्ट राहील का हा फोन?
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 10:51 AM

नवी दिल्ली | 11 February 2024 : Tecno Pop 8 ची बाजारात सध्या चर्चा सुरु आहे. ही चर्चा केवळ हा स्मार्टफोन iPhone सारखा दिसतो म्हणून सुरु नाही. तर त्याचे फीचर्स आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वस्त किंमत, यामुळे त्याकडे ग्राहकाचे लक्ष वेधल्या गेले आहे. या मोबाईलमध्ये दोन रंग आहेत. यामध्ये ग्रॅव्हिटी ब्लॅक आणि मिस्ट्री व्हाईट असे दोन रंग आहेत. हा स्मार्टफोन ग्राहकांना अवघ्या 7 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येतो. त्यातील फीचर्स पण लक्षवेधी आहेत. तर बॅटरी पण दमदार आहेत. जाणून घेऊयात या स्मार्टफोनविषयी…

असा आहे स्मार्टफोन

Tecno चा नवीन स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह मिळतो. यामध्ये AI तंत्रज्ञानासह 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. किंमतीच्या दृष्टीने हा स्मार्टफोन एकदम किफायतशीर आहे. या स्मार्टफोनचा लूक अगदी आयफोनसारखा आहे. त्यामुळे पहिल्यांदा हा जणू आयफोनच असल्याचे भासते. हा लूक पैसे वसूल करणारा आहे.

हे सुद्धा वाचा

Tecno Pop 8: वैशिष्ट्ये

  1. Design : टेक्नो पॉप 8 चे डिझाईन अगदी जोरदार आहे. बॉक्स उघडताच तुमच्या हातात एक चमकदार स्मार्टफोन येतो. रिअर कॅमेरा पोझिशनमुळे या स्मार्टफोनची मागील बाजू हुबेहुब आयफोनसारखी दिसते. या फोनचे कोपरे पण एकदम कर्व्ह्ड आहे. त्यामुळे हाताला एकदम खास ग्रिफ मिळते. डिझाईन एकदम जोरदार असल्याने हा लूक तुम्हाला खास फिल देणारा आहे.
  2. Display : या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. बजेटनुसार या स्मार्टफोनचा आकार योग्य आहे. यामध्ये पंच-होल सेटअप आणि 90Hz चा स्क्रीन रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. HD+ रिझोल्यूशनमुळे हा फोन दमदार दिसतो. गेम खेळताना डिस्प्लेवर ताण जाणवत नाही. यामध्ये आयफोनसारखा लूकच नाही तर आयफोनमधील डायनामिक आयलँडसारखा डायनामिक पोर्ट फीचर पण आहे.
  3. बॅटरी आणि कॅमेरा : या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी मिळते. तुम्ही व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेम खेळल्यास मात्र तुम्हाला बॅटरी चार्ज करणे आवश्यक आहे. नसता दिवसभर तुम्हाला बॅटरी चार्ज करण्याची गरज पडणार नाही. या फोनला 10W चार्जिंग सपोर्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये 12MP+AI रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. तर 8MP फ्रंट कॅमेरा मिळतो.
Non Stop LIVE Update
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन.
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप.
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना.
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?.
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार.
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?.
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं.
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास.
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.