
आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो आणि त्यासोबत असतो सतत वापरला जाणारा चार्जर. आपण बरेचदा फोन चार्जिंगनंतर चार्जर प्लगमध्येच ठेवतो, पण स्विच बंद करत नाही. अनेकांना वाटते की फोन काढल्यानंतर वीजेचा काही वापर होत नाही. मात्र हे पूर्णपणे खरे नाही. चार्जर प्लगमध्ये सतत ठेवण्यामुळे किती वीज वाया जाते, हे आपण या बातमीतून समजून घेणार आहोत.
फोन चार्ज झाल्यानंतर चार्जर प्लगमध्ये ठेवण्याचे परिणाम : विशेषज्ञांच्या मते, जेव्हा चार्जर प्लगमध्ये असतो आणि फोन जोडलेला नसतो, तरीही त्यातून थोडी वीज खर्च होते. ही उर्जा फारशी मोठी नसली, तरी हीच क्रिया जर दररोज आणि अनेक उपकरणांसाठी केली गेली, तर वार्षिक वीज वापरात लक्षणीय वाढ होऊ शकते. याला तज्ज्ञ “व्हॅम्पायर पॉवर” किंवा “स्टँडबाय पॉवर” असं म्हणतात.
चार्जरच्या आत चालणारी यंत्रणा : प्रत्येक चार्जरमध्ये एक छोटा ट्रान्सफॉर्मर आणि सर्किट बोर्ड असतो, जो सतत कार्यरत राहण्यासाठी उर्जेची मागणी करतो. ही यंत्रणा फोन जोडलेला नसतानाही जागरूक स्थितीत असते. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना, पण वीज खर्च होते. हा खर्च दरमहा आणि दरवर्षीच्या हिशोबाने मोठा आकडा गाठू शकतो.
1. फोन चार्ज झाला की लगेच चार्जर प्लगमधून काढा.
2. वापरात नसलेली उपकरणे सुद्धा बंद करा आणि प्लगमधून अनप्लग करा.
3. पॉवर स्ट्रिप्स वापरा, ज्यामुळे एकाच बटनाने अनेक उपकरणे बंद करता येतील.
1. वीजबिल कमी येईल
2. उपकरणे जास्त वेळ टीकतील
3. पर्यावरणावर होणारा भार कमी होईल
अनेक उपकरणांचे एकत्रित परिणाम: स्मार्टफोन चार्जरशिवाय, टीव्ही, सेट-टॉप बॉक्स, संगणक, लॅपटॉप चार्जर इत्यादी उपकरणे हीही अशाच प्रकारे प्लगमध्ये लावून ठेवली जातात. जर हे सर्व उपकरणे वापरानंतर लगेच बंद केली गेली, तर संपूर्ण घराच्या वीज बिलात 5-10% पर्यंत बचत होऊ शकते.
शाश्वत जीवनशैलीकडे एक पाऊल : ऊर्जा बचत ही केवळ तुमच्या घरापुरती मर्यादित नाही. ही एक सवय बनवली गेल्यास देशपातळीवर ऊर्जा साठवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अशा छोट्या कृतींमधून मोठा बदल घडवता येतो. चार्जर अनप्लग करणे ही त्यातील एक महत्त्वाची कृती ठरू शकते.