AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

itel कंपनी 1 फेब्रुवारीला सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या काय आहे खास?

स्मार्टफोन निर्माती कंपनी itel 1 फेब्रुवारीला त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन प्रिमियम लुक आणि HD+ डिस्प्लेसह सादर केला जाणार आहे.

itel कंपनी 1 फेब्रुवारीला सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या काय आहे खास?
आयटेल मार्चमध्ये लाँच करणार दोन स्मार्ट टीव्ही
| Updated on: Jan 28, 2021 | 6:09 PM
Share

मुंबई : स्मार्टफोन निर्माती कंपनी itel 1 फेब्रुवारीला त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन प्रिमियम लुक आणि HD+ डिस्प्लेसह सादर केला जाणार आहे. विक्रीसाठी एक्सक्लूझिव्हली Amazon या ई-कॉमर्स साईटवर हा स्मार्टफोन उपलब्ध केला जाणार आहे. रेंडर इमेजनुसार कंपनी हा स्मार्टफोन A-सिरीजअंतर्गत लाँच करणार आहे. यामध्ये 5.5 इंचांची मोठी स्क्रीन सोबत डुअल सिक्योरिटी फिचर देण्यात आलं आहे. यामध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. (itel to launch new A-series budget smartphone on 1 february, know more details)

itel कंपनी नेहमीच किफायतशीर स्मार्टफोन लाँच करत असते. असं म्हटलं जातंय की, हा स्मार्टफोनदेखील खूपच किफायतशीर असेल. या स्मार्टफोनची किंमत 6 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असू शकते. किफायतशीर स्मार्टफोनच्या बाबतीत itel कंपनी एक स्ट्राँग ब्रँड बणली आहे. कंपनीने नुकताच एक Vision1 PRO स्मार्टफोन लाँच केला आहे. सोबतच कंपनीने 7 हजार रुपयांच्या स्मार्टफोन्सच्या सेगमेंटवर मजबूत पकड मिळवली आहे.

Itel Vision1 PRO मध्ये 6.52 इंचांचा IPS वॉटरड्रॉप इन्सेल डिस्प्ले देण्यात आला आहे जो HD+ रेजोल्यूशन आणि 450 निट्स ब्राइटनेससह सादर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 1.4GHz चा क्वाड कोर प्रोसेसर मिळेल जो 2 जीबी रॅमसह येतो. फोनमध्ये 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड 10 गो एडिशनवर काम करतो. तसेच या फोनमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा ‘हा’ किफायतशीर स्मार्टफोन 2 फेब्रुवारीला लाँच होणार

POCO कंपनीने यावर्षी त्यांचा पहिला स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनी त्यांचा बहुप्रतीक्षित POCO M3 हा स्मार्टफोन 2 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता लाँच करणार आहे. नुकताच कंपनीने या स्मार्टफोनचा एक टीझर लाँच केला आहे. ज्यामध्ये या स्मार्टफोनला रियल किलर म्हटलं आहे. या फोनचा टीझर पाहिल्यानंतर युजर्समध्ये या स्मार्टफोनबाबत क्रेझ निर्माण झाली आहे. कंपनीने POCO M3 हा स्मार्टफोन इंडोनेशियात आधीच लाँच केला आहे. असं म्हटलं जातंय की, भारतात या स्मार्टफोनची किंमत 12 ते 14 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. हा स्मार्टफोन पिवळ्या, निळ्या आणि काळ्या रंगात उपलब्ध करुन दिला जाईल. (POCO M3 smartphone is ready to launch with 6000mAh battery and triple rear camera)

Poco M3 स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोनचा डिस्प्ले वॉटरड्रॉप स्टाईल नॉचसह येईल. फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरसह Adreno 610 GPU चा सपोर्ट मिळेल. पोको एम 3 स्मार्टफोन गूगलच्या अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टिम बेस्ड एमआययूआय वर आधारित असेल. फोनमध्ये 6000 MAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. पोको एम 3 स्मार्टफोन OnePlus 8T Cyberpunk 2077 स्पेशल एडिशन प्रमाणे डिझाइन केलेला आहे. फोन ड्युअल टोन फिनिश आणि पोको ब्रँडिंग कॅमेर्‍यासह येईल.

हेही वाचा

Samsung च्या या ढासू स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांहून अधिक डिस्काऊंट

आता 500 रुपयांपेक्षाही कमी प्लॅनमध्ये लुटा अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सची मजा!

Xiaomi कडून या ढासू स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन

(itel to launch new A-series budget smartphone on 1 february, know more details)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.