जिओच्या 1234 रूपयांच्या रिचार्जमध्ये मिळणार इतका जीबी डेटा, वैधता किती?

जिओचा 1 हजार 234 रूपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला मिळणार 336 दिवसांची वैधता. चला या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांविषयी आणि या प्लॅनसाठी कोण पात्र आहे याबद्दल आजच्या लेखात सविस्तर माहिती घेऊयात.

जिओच्या 1234 रूपयांच्या रिचार्जमध्ये मिळणार इतका जीबी डेटा, वैधता किती?
Jio recharge
| Edited By: | Updated on: Mar 25, 2026 | 3:03 PM

तुम्हाला जर कमी किमतीत जास्त वैधता हवी असेल तर आपल्या भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे 1 हजार 234 रूपयांमध्ये 336 दिवसांची वैधता देणारा एक रिचार्ज प्लॅन आहे. या रिचार्ज प्लॅनसोबत तुम्हाला कोणते फायदे मिळतील? जिओच्या 1 हजार 234 रूपयांच्या प्लॅनला एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाकडे काही पर्याय आहेत का, हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

जिओच्या 1 हजार 234 रूपयांच्या प्लॅनची माहिती

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 0.5GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दर 28 दिवसांत 300 SMS मिळतील. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, डेटा संपल्यानंतर स्पीड 64kbps पर्यंत कमी होईल.

जिओच्या 1 हजार 234 रूपयांच्या प्लॅनची ​​वैधता

हा जिओ रिचार्ज प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह येतो. दररोज 0.5 जीबी डेटासह हा प्लॅन 336 दिवसांमध्ये एकूण 168 जीबी डेटा देतो. हा प्लॅन जिओभारत फोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी आहे, म्हणजेच तुमच्याकडे हा फोन असल्यास तुम्ही या प्लॅनचा लाभ घेऊ शकता. या प्लॅनमध्ये जिओ सावन आणि जिओ टीव्हीच्या मोफत ॲक्सेससारखे काही अतिरिक्त फायदे देखील मिळतात. डेटा मर्यादा कमी असली तरी, ज्यांना डेटापेक्षा वैधतेची जास्त गरज आहे, त्यांच्या गरजा तो पूर्ण करतो.

एअरटेल आणि व्हीआय (Vi) कडे सुद्धा स्वस्त प्लॅन्स आहेत का?

हा रिलायन्स जिओ प्लॅन सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही, तर केवळ कंपनीचा जिओ भारत फोन असलेल्यांसाठीच आहे. दुसरीकडे एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया इतक्या कमी किमतीत 336 दिवसांच्या वैधतेचा कोणताही प्लॅन देत नाहीत.

Follow Us