AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30‍0 दिवसांची वैधता असलेला BSNL चा ‘हा’ स्वस्त रिचार्ज प्लॅन तुम्ही पाहिलात का? जाणून घ्या किंमत

तुमच्याकडे जर बीएसएनएल कंपनीचे प्रीपेड सिम असेल तर तुम्हाला हा रिचार्ज प्लॅन नक्की आवडेल. दीर्घ वैधतेसोबतच या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा, कॉलिंग, एसएमएस इत्यादी सुविधा मिळतात. चला तर मग या प्लॅनची किंमत जाणून घेऊयात.

30‍0 दिवसांची वैधता असलेला BSNL चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन तुम्ही पाहिलात का? जाणून घ्या किंमत
BSNL recharge planImage Credit source: Magnific
| Edited By: | Updated on: Jul 04, 2026 | 4:19 PM
Share

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) असलेली टेलिकॉम कंपनी त्यांच्या वापरकर्त्यांसाठी अनेक परवडणारे रिचार्ज प्लॅन्स सादर करत असते. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक प्लॅन शोधला आहे, जो 1 हजार 499 रूपयांच्या किंमतीमध्ये 300 दिवसांची वैधता देतो. जर तुमच्याकडे BSNL चे प्रीपेड सिम असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो, विशेषतः अशा वेळी जेव्हा रिचार्ज प्लॅन हे हळूहळू महाग होत आहे. हा प्लॅन केवळ उत्कृष्ट वैधताच देत नाही, तर FUP ​​मर्यादेसह अमर्यादित डेटादेखील देतो. चला तर मग आजच्या लेखात आपण बीएसएनएलच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात.

या BSNL रिचार्ज प्लॅनमध्ये 300 दिवसांची वैधता, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड डेटा मिळतो. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार या प्लॅनमध्ये 32GB ची FUP मर्यादा आहे, म्हणजेच 32GB डेटा वापरल्यानंतर स्पीड लिमिट 40kbps पर्यंत कमी होईल. हा प्लॅन व्हाउचर फक्त प्रीपेड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

जर तुम्हाला तुमचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी जास्त वैधतेची आवश्यकता असेल तर कंपनीने अनेक परवडणारे रिचार्ज प्लॅन्स देखील लाँच केलेले आहेत. टेलिकॉमटॉकच्या एका अहवालानुसार बीएसएनएलने म्हटले आहे की, 1 हजार 499 रूपयांचा बीएसएनएल प्लॅन हा कंपनीच्या सर्वात लोकप्रिय प्लॅन व्हाउचर्सपैकी एक आहे. 1 हजार 499 रूपयांमध्ये मिळणारी 300 दिवसांची वैधता आणि फायदे पाहता, हा एक खूप चांगला सौदा ठरू शकतो. हे प्लॅन व्हाउचर्स वापरकर्त्यांना त्यांचे सिम सक्रिय ठेवण्यास मदत करतील.

जिओकडे दीर्घ मुदतीचा स्वस्त प्लॅन आहे का?

रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह 1 हजार 748 रूपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 3600 एसएमएस, तसेच जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउड स्टोरेजचा समावेश आहे. मात्र हे लक्षात घेण्यासारखे आहे की डेटाचे फायदे मिळत नसतानाही हा प्लॅन बीएसएनएलच्या 1 हजार 499 रूपयांच्या प्लॅनपेक्षा महाग आहे. दुसरीकडे वैधतेच्या बाबतीत जिओचा प्लॅन उत्तम आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा