AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA: केप वर्डे या छोट्या देशाने अर्जेंटीनाच्या तोंडाला आणला फेस, कसा बसा सामना जिंकला?

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या राउंड ऑफ 32 फेरीत सर्वात छोटा देश असलेल्या केप वर्डेने गतविजेत्या अर्जेंटीनाला विजयासाठी झुंजवलं. हा सामना इतका अतितटीचा झाला की अर्जेंटीनाच्या चाहत्यांची धाकधूक वाढली होती. पण अर्जेंटीनाने अतिरिक्त वेळेत बाजी मारली.

FIFA: केप वर्डे या छोट्या देशाने अर्जेंटीनाच्या तोंडाला आणला फेस, कसा बसा सामना जिंकला?
FIFA: केप वर्डे या छोट्या देशाने अर्जेंटीनाच्या तोंडाला आणला फेस, कसा बसा अतिरिक्त वेळेत सामना जिंकला?Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 04, 2026 | 4:09 PM
Share

Argentina vs Cape Verde, FIFA World Cup 2026: गतविजेत्या अर्जेंटीना संघाला राउंड ऑफ 32 मध्ये केप वर्डे संघाने कडवी झुंज निघाली. या सामन्यात विजय मिळवताना अर्जेंटीनाच्या खेळाडूंच्या तोंडाला फेस आला. एक वेळ अशी आली होती की, या स्पर्धेत मोठा उलटफेर होतो की काय अशी स्थिती होती. अतिरिक्त वेळेत अर्जेंटीनाने केप वर्डे संघाला 3-2 ने मात दिली. या सामन्याच्या 111 व्या मिनिटाला विजयी गोल अर्जेंटीनाने मारला आणि विजयाची नोंद केली. सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघात कडवी झुंज पाहायला मिळाली. या सामन्यात पहिला गोल अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनल मेस्सीने मारला. सामन्याच्या 29व्या मिनिटाला लिसांद्रो मार्टिनेज याने उत्तम पास केला आणि मेस्सीने त्याचं रुपांतर गोलमध्ये केलं. त्यामुळे अर्जेंटिनाने 1-0 ने आघाडी घेतली.

केप वर्डे हा फिफा वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेतलेला छोटा देश आहे. त्यात एक गोल पिछाडीवर असूनही दिग्गज संघाविरुद्ध चिवट खेळी केली. केप वर्डेने दुसऱ्या हाफच्या 59व्या मिनिटाला गोल बरोबरी साधली. डेरोए डुआर्टेने गोल मारला आणि 1-1 बरोबरी साधली. यानंतर गोल झाला नाही आणि सामना एक्स्ट्रा वेळेत गेला. त्यामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली. पण अर्जेंटीनाने यात आणखी एक गोल मारत 2-1 ने आघाडी घेतली. पण लगेचच केप वर्डेच्या सिडनी लोपेज कॅबरने गोल मारला आणि पुन्हा 2-2 अशी बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जातो की काय अशी स्थिती होती. पण या सामन्याच्या 111 व्या मिनिटाला निर्णायक गोल झाला आणि सामना अर्जेंटीनाने जिंकला.

अर्जेंटिनाचा निर्णायक आणि तिसरा गोल केप वर्देच्या डिने बोर्जेसच्या आत्मघाती गोलमुळे मिळाला. मेस्सीला फ्री किक मिळाली होती. पण केप वर्डेचा गोलकीपर वोझिन्हा याने हवेत उडी मारत हा चेंडू गोलपोस्टच्या आत जाण्यापासून अत्यंत शिताफीने अडवला. पण चेंडू अडवताना तो थेट गोलपोस्टच्या बाजूने बाहेर गेला. त्यामुळे अर्जेंटीनाला कॉर्नर किक दिली गेली. सामन्याच्या 111 व्या मिनिटाला लियोनेल मेस्सीने एक अप्रतिम कॉर्नर कीक मारली. हवेत उडालेल्या बॉलला अर्जेंटिनाचा डिफेंडर ख्रिस्टियन रोमेरो याने जोरदार हेडर मारला. हा हेडर थेट केप वर्डेचा खेळाडू डिने बोर्जेस याच्या अंगाला लागून डिफ्लेक्ट झाला आणि गोल पोस्टच्या आत गेला.

Follow Us
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?
मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच
Viral Video | मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच पाणी
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा व्हिडीओ
फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच
Devendra Fadnavis | 6 तारखेपर्यंत धोका! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच
आणखी एका नेत्याची जीभ घसरली, थेट म्हणाले, रस्त्यावर उतरूनकाय उXXX...
आणखी एका नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, रस्त्यावर उतरून तुम्ही काय उXXX...
सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही संपादक होता येतं; फडणवीसांचा नाव
Devendra Fadnavis | सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवताही संपादक होता येतं; मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता संजय राऊतांवर घणाघात
मुंबईत भयंकर घडलं! धो धो बरसणाऱ्या पावसात रस्ताच... Video तुफान
Video | मुंबईत भयंकर घडलं! धो धो बरसणाऱ्या पावसात रस्ताच... व्हिडीओ तुफान व्हयरल
रुग्णालयातूनही एकनाथ शिंदेंचं काम सुरूच! शिवसेना शाखेतील नेत्यांना
DCM Eknath Shinde | रुग्णालयातूनही एकनाथ शिंदेंचं काम सुरूच! शिवसेना शाखेतील नेत्यांना दिल्या तातडीच्या सूचना, थेट...
अमित साटमांना निर्लज्जांचे शिरोमणी पुरस्कार द्या! मनसेचा संताप
Sandeep Deshpande | अमित साटमांना निर्लज्जांचे शिरोमणी पुरस्कार द्या! मनसेचा संताप; राजीनामा द्या, नाहीतर पदावरून हटवा