Jio चा 200 दिवसांच्या प्लॅनमध्ये मिळणार अनेक फायदे; मोफत 5जी सबस्क्रिप्शन आणि जेमिनी सबस्क्रिप्शन, जाणून घ्या किंमत
जिओच्या या नवीन प्लॅनमध्ये दीर्घ वैधतेसह अनेक फायदे मिळत आहे. यामध्ये 200 दिवसांसाठी दररोज 2.5 जीबी डेटा, अनलिमिटेड 5जी ॲक्सेस आणि कॉलिंग मिळते. तसेच यामध्ये मोफत जिओहॉटस्टार आणि जेमिनी प्रो यांचाही समावेश आहे.चला तर मग या प्लॅनची किंमत जाणून घेऊयात.

स्नेहल मेंगळ, टीव्ही 9 मराठी टेक डेस्क : तुम्ही जर वारंवार रिचार्ज करून थकला असाल, तर जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2.5 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. पात्र वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5जी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मेसेजेस देखील मिळतात. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार, जिओएआयक्लाउड आणि गूगल जेमिनी प्रो सारख्या लाभांचाही समावेश आहे. चला तर मग या प्लॅनची किंमत आणि फायदे जाणून घेऊयात.
200 दिवसांची वैधता आणि 500 जीबी डेटा आणि किंमत
जिओच्या या प्लॅनची किंमत 2 हजार 25 रूपये आहे. तर या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 200 दिवसांची वैधता मिळते. या कालावधीत वापरकर्त्यांना दररोज 2.5 जीबी हाय-स्पीड डेटा दिला जातो, ज्यामुळे संपूर्ण वैधतेच्या कालावधीत एकूण 500 जीबी डेटा मिळतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64 केबीपीएसपर्यंत कमी होईल. पात्र वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5जी डेटा देखील मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मेसेजेसचाही समावेश आहे.
JioHotstar आणि JioAIcloud चे फायदे
या प्लॅनसोबत, जिओ वापरकर्त्यांना जिओहॉटस्टारचे मोबाईल प्लस हॉलीवूड सबस्क्रिप्शनही देत आहे. याव्यतिरिक्त वापरकर्त्यांना जिओएआय क्लाउडवर 50 जीबी मोफत क्लाउड स्टोरेजही मिळेल. याचा अर्थ तुम्हाला एकाच रिचार्जमध्ये मनोरंजनासाठी ओटीटी सबस्क्रिप्शन आणि फाईल स्टोरेजसाठी क्लाउड स्टोरेज दोन्ही मिळतात. ज्या वापरकर्त्यांना एकाच रिचार्जमध्ये डेटा, कॉलिंग आणि अतिरिक्त डिजिटल सेवा हव्या आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन विशेषतः उपयुक्त ठरू शकतो.
18 महिन्यांसाठी गूगल जेमिनी प्रो मोफत
या जिओ प्लॅन अंतर्गत पात्र ग्राहकांना 35,100 किंमतीचा 18 महिन्यांचा गूगल जेमिनी प्रो प्लॅन मोफत दिला जात आहे. या प्लॅनमध्ये 5000GB क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनानासह इतर AI फीचर्सचाही समावेश आहे. याचा अर्थ असा की, या 2 हजार 25 रूपयांच्या रिचार्जमध्ये दीर्घ वैधता आणि मोबाईल डेटासह AI आणि क्लाउड स्टोरेजशी संबंधित अनेक फायदे समाविष्ट आहेत.