Google Pixel 6 मध्ये खास अंडर डिस्प्ले कॅमरा दिसणार? स्मार्टफोनच्या पेटंट डिझाईनची जोरदार चर्चा

गुगलने आपल्या पिक्सल (Google Pixel) स्मार्टफोनमध्ये एक पाऊल आणखी पुढे टाकल्याचं बोललं जातंय. यासाठी गुगलने कथितपणे नव्या फोनचं पेटंट देखील घेतल्याची चर्चा आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:11 AM, 27 Dec 2020
Google Pixel 6 मध्ये खास अंडर डिस्प्ले कॅमरा दिसणार? स्मार्टफोनच्या पेटंट डिझाईनची जोरदार चर्चा

वॉशिंग्टन : गुगलने आपल्या पिक्सल (Google Pixel) स्मार्टफोनमध्ये एक पाऊल आणखी पुढे टाकल्याचं बोललं जातंय. यासाठी गुगलने कथितपणे नव्या फोनचं पेटंट देखील घेतल्याची चर्चा आहे. या फोनविषयीची खास बाब म्हणजे या स्मार्टफोनमध्ये अंडर डिस्प्ले कॅमरा देण्यात आलाय (Know all possibilities of Google Pixel 6 Smartphone ).

सध्या तरी गुगलने एकूण 4 स्मार्टफोनच्या डिझाईनचं पेटंट केलं आहे. यात गुगल पिक्सल 6 (Google Pixel 6) स्मार्टफोनचाही समावेश असेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. या फोनमध्ये कोणत्याही होलशिवाय डिस्प्ले देण्यात येणार आहे. असं असलं तरी पेटंटच्या कागदपत्रांमध्ये अंडर डिस्प्ले कॅमेराचा (Under display camera) उल्लेख नाही. मात्र, या चारपैकी कोणत्याही पेटंट डिझाईनमध्ये फ्रंट कॅमरा असल्याचं दिसत नाही. त्यामुळेच हा कॅमेरा अंडर डिस्प्ले असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

डिझाईनचे जे फोटो समोर येत आहेत त्यात गुगल पिक्सलच्या या नव्या फोनचा पूर्ण डिस्प्ले दिसतोय. बॅक साईडला मात्र कॅमेरा सेटअप दिसत आहे. याआधी देखील गुगलने इन-डिस्प्ले कॅमरा टेक्नोलॉजीवर काम केल्याचं समोर आलं होतं. गुगलशिवाय Samsung, ZTE, Oppo, Xiaomi आणि Huawei सारख्या कंपन्या देखील इन-डिस्प्ले कॅमरा टेक्नोलॉजीवर काम करत आहेत.

गुगलने काही दिवसांपूर्वीच Google Pixel 5 स्मार्टफोन लॉन्च केला होता. गुगल पिक्सल 5 मध्ये एसडी 765 जी एसओसी प्रोसेसर देण्यात आलाय. 5 जी रेडी तंत्रज्ञानाने सज्ज असलेला हा पहिला फोन आहे. आगामी पिक्सल फोनमध्ये 6 इंचाची स्क्रीन देण्यात आलीय. या फोनला वायरलेस चार्जिंगही सपोर्ट असेल. फोनमध्ये OLED डिस्प्ले देण्यात आलाय. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 चं प्रोटेक्शन आहे.

हेही वाचा :

नववर्षात Google Stadia मध्ये चार नव्या गेमचा समावेश, किंमत काय?

Google | कुठून देतो ‘गुगल बाबा’ तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर, जाणून घ्या या मागचं रहस्य…

2021 हे वर्ष फोल्डेबल स्मार्टफोन्सचं, ‘या’ कंपन्या भारतात दमदार स्मार्टफोन्स लाँच करणार

Know all possibilities of Google Pixel 6 Smartphone