Koo Self-Verification Feature लाँच, युजर्स स्वतःच मिळवू शकणार ग्रीन टिक

अक्षय चोरगे

|

Updated on: Apr 07, 2022 | 3:00 PM

देशातील पहिला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग मंच (Micro Blogging Platform) कू ॲपने (Koo App) ऐच्छिक सेल्फ-वेरिफिकेशन फीचर लॉन्च केले आहे. हे करणारा कू जगातला सर्वात पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनला आहे.

Koo Self-Verification Feature लाँच, युजर्स स्वतःच मिळवू शकणार ग्रीन टिक
Koo App
Image Credit source: File

मुंबई : देशातील पहिला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग मंच (Micro Blogging Platform) कू ॲपने (Koo App) ऐच्छिक सेल्फ-वेरिफिकेशन फीचर लॉन्च केले आहे. हे करणारा कू जगातला सर्वात पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनला आहे. आता कोणताही युजर आपल्या शासनाने अधिकृत मंजूरी दिलेले ओळखपत्र वापरून अगदी काही क्षणात स्वत:ला सेल्फ व्हेरिफाय (Self Verification) करू शकतो. यातून युजर्स कू वर आपल्या अकाऊंटचा खरेपणा सिद्ध करण्यास सक्षम बनतात. सोबतच युजर्सनी शेअर केलेले विचार आणि मतंही यातून विश्वासार्ह बनतात. कंपनीने म्हटलं आहे की, ऐच्छिक सेल्फ-वेरिफिकेशन हे सच्च्या आवाजांना ठळकपणे अधोरेखित करते. या प्रक्रियेनंतर हिरव्या रंगाची टिक (Green Tick) यूजरच्या अकाउंटला सेल्फ-वेरिफाइड झाल्याच्या रुपात एक खास ओळख देईल.

Koo App असा पहिला ‘महत्त्वपूर्ण सोशल मीडिया मंच आहे, ज्याने माहिती तंत्रज्ञान (मध्यवर्ती दिशानिर्देश आणि डिजिटल माध्यम आचारसंहिता) नियम, 2021 च्या नियम 4(7) नुसार या फीचरला सक्रीय केले आहे.

या फीचरच्या माध्यमातून यूजर्स सरकारी ओळखपत्राचा क्रमांक ‘कू’वर भरतात. त्यानंतर फोनवर आलेला ओटीपी टाकतात आणि यशस्वी प्रमाणीकरण झाल्यावर त्यांच्या प्रोफाइल्स हिरव्या रंगाच्या टिकसह सेल्फ-वेरिफाई होतात. ही सगळी प्रक्रिया अगदी काही क्षणातच पूर्ण होते. विशेष म्हणजे ही सगळी प्रक्रिया सरकारद्वारे, अधिकृत थर्डपार्टी द्वारे केली जाते. या प्रक्रियेदरम्यान Koo App यासंबंधीची कुठलीच माहिती स्वत:कडे साठवत नाही.

फसवणुकीला आळा बसेल

प्लॅटफॉर्मवर यूजर्सना सशक्त बनवण्यासह प्रामाणिकतेला प्रोत्साहन देत ऐच्छिक सेल्फ-वेरिफिकेशनच्या माध्यमातून ऑनलाइन स्तरावर चुकीची माहिती, अभद्र भाषा, वाईट वर्तन आणि फसवणुकीला आळा बसेल अशीही आशा कंपनीने व्यक्त केली आहे.

सेल्फ वेरिफिकेशन प्रक्रिया असलेला पहिला मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म

Koo App चे सह-संस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, “सोशल मीडियावर विश्वास आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यात Koo App सर्वात पुढे आहे. ऐच्छिक सेल्फ-वेरिफिकेशन प्रणाली सुरू करणारा जगातला पहिला मंच म्हणवून घेताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. यूजर्स आमच्या सुरक्षित पडताळणी प्रक्रियेच्या माध्यमातून काही सेकंदातच सेल्फ-वेरिफिकेशन मिळवू शकतात. हे यूजर्सला आधिक पारदर्शकता देण्यासह मंचावर जबाबदार व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. बहुतांश सोशल मीडिया मंच हा विशेषाधिकार केवळ काहीच खात्यांना देतात. Koo App असा पहिला मंच आहे ज्याने आता हरेक यूजरला समान विशेषाधिकार मिळवण्याचा हक्क दिला आहे.”

सेल्फ वेरिफिकेशनबाबत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

‘कू’ युजर्सचा आधार क्रमांक संग्रहित करते का?

नाही. ‘कू’ आधार क्रमांक स्वतःकडे संग्रहित करत नाही. आधार क्रमांक प्रमाणित करण्यासाठी UIDAI मान्यताप्राप्त तिसऱ्या घटकाची (थर्ड पार्टी) सेवा वापरली जाते.

वेरिफिकेशननंतर माझे आधार कार्ड तपशील ‘कू’ वर दिसतील का?

नाही. हे तपशील फक्त यूजर्सची सत्यता प्रमाणित करण्यासाठी वापरले जातात.

इतर यूजर्सना माझे नाव आणि आधार माहिती यांची महिती मिळते का?

नाही. यूजर्सच्या प्रोफाईलवरील तपशील पडताळणीपूर्वी जसा होता तसाच राहतो.

‘कू’वर माझे आधार तपशील नोंदवणे सुरक्षित आहे का?

होय. Koo वरची ऐच्छिक सेल्फ-व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्णतः सुरक्षित आहे. ही पडताळणी प्रक्रिया भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) अधिकृत थर्ड-पार्टीद्वारे केली जाते. ‘कू’ यूजरचा कोणताही डेटा साठवून ठेवत नाही.

‘कू’ युजरने हे का करावे?

जो युजर त्याच्या/तिच्या प्रोफाइलची पडताळणी करतो तो एक अधिकृत, खरा वापरकर्ता म्हणून ओळखला जातो. साहजिकच त्या व्यक्तीच्या विचार आणि मतांना अधिक विश्वासार्हता मिळते. ऐच्छिक सेल्फ वेरिफिकेशन हे ‘कू’च्या प्लॅटफॉर्मवर खऱ्या, अस्सल आवाजांना प्रोत्साहन देते. यातून युजरला एरवी काही प्रतिष्ठित खात्यांनाच मिळणारा पडताळणीचा विशेषाधिकारदेखील प्राप्त होतो.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI