
Why Red Button on Laptop Keyboard : लॅपटॉपमध्येच आजकाल माऊस असतो. तरीही काही लोक एक शिल्लकचा माऊस लॅपटॉपला जोडतात. त्यामुळे लॅपटॉप हातळण्याचे काम सोपे होते. पण लॅपटॉपच्या की-बोर्डवर एक लाल बटण असते. जेव्हा तुम्ही या बटणाला स्पर्श कराल तेव्हा स्क्रीनवरील कर्सर हालतो. हा एक प्रकारचा छोटा माऊस असतो. हे बटण लॅपटॉपच्या स्क्रीनवरील कर्सर नियंत्रित करतो. हे बटण खासकरून लिनोवाच्या थिंकपॅड लॅपटॉपमध्ये दिसते. याचा वापर कशासाठी होतो हे समजून घेऊयात.
जर काही लॅपटॉपवर लाल बटण दिसले आणि ते कशासाठी असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचा काय वापर आहे, हे अगोदर समजून घ्या. अनेक लोकांना त्याची माहिती नसते. काहींना हे शोचे बटण वाजते. तर काहींना हे बटण काही विशेष असल्याचे मानतात.
ट्रॅकपॉईंट काय आहे?
या लाल बटणाला ट्रॅकपॉईंट म्हणतात. हे बटण लॅपटॉपच्या कीबोर्डमध्ये असते. हे लाल बटण G, H, आणि B या कीच्या मधात असते. याला पॉईटिंग स्टीक सुद्धा म्हटल्या जाते. हे कर्सरला स्क्रीनवर इकडून तिकडे नेण्यासाठी वापरतात. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला हे बटण हलवण्याची गरज नसते. तर त्या दिशने हळूहळू दाबावे लागते. त्या दिशेने मग कर्सर जातो. हे बटण खासकरून लिनोवाच्या थिंकपॅड या लॅपटॉपमध्ये असते.
ट्रॅकपॉईंट कसे काम करते?
ट्रॅकपॉईंट एक खास प्रकारचे डिव्हाईस आहे. हे दबावा आधारीत काम करते. हे हलवण्याचे कारण नाही. ज्या दिशेने तुम्ही ते दाबाल, त्या दिशेने कर्सर जातो. जर तुम्ही हलक्या हाताने हे बटण दाबाल तर कर्सर हळू पुढे जाईल. पण जोरात दाबले तर कर्सर तेजीने पुढे जाते. यामुळे तुम्हाला वारंवार टचपॅड दाबण्याची गरज नाही.
कीबोर्डावरच राहतात हात
ट्रॅकपॉईंटचा एक मोठा फायदा आहे. यामुळे तुम्हाला कर्सरसाठी हात कीबोर्डवरून हटवण्याची गरज पडत नाही. जे लोक गतीने टाईप करतात. त्यांच्यासाठी हा पर्याय अत्यंत चांगला आहे. त्यांच्यासाठी ट्रॅकपॉईट एकदम चांगले काम करते. ट्रॅकपॉईंटच्या वापरामुळे मनगटावरील ताण कमी होतो. जे सतत टायपिंग करतात. अनेक तास टायपिंग करतात. त्यांच्यासाठी हे बटण फायद्याचे ठरते. त्यामुळे आता एखादा लॅपटॉपला असे लाल बटण दिसले तर ते एकदा तपासून पाहा. त्याचा वापर नक्की करा. त्यावरून त्याचा उपयोग तुमच्या लक्षात येईल.