AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी; पंतप्रधान मोंदींना मारण्याचा CIA चा डाव? ढाक्यात भारत-रशियाच्या गुप्तहेरांनी कट असा उधळला, नेमकं घडलं काय?

CIA plot to kill Prime Minister Modi : 'मी चीनला गेलो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवत आहात की मी परत आलो म्हणून टाळ्या वाजवताय', असा सवाल काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्याचा अर्थ आता लोकांना कळू लागला आहे.

मोठी बातमी; पंतप्रधान मोंदींना मारण्याचा CIA चा डाव? ढाक्यात भारत-रशियाच्या गुप्तहेरांनी कट असा उधळला, नेमकं घडलं काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्लादिमीर पुतीन
| Updated on: Oct 26, 2025 | 2:22 PM
Share

India-Russia Spy : अमेरिकेची गुप्तहेर संघटना (CIA) जगभरातील अनेक देशात घातपात आणि राजकीय उलथापालथ घडवते. सरकार पाडणे, नेत्यांच्या हत्या घडवणे आणि शेजारील देशांमध्ये भांडणं लावण्याचे काम सीआयए करत असल्याचे अनेकदा उघड झाले. CIA मुठभर लोकांना हाताशी धरुन बंडखोरी घडवते. सरकार उलथवून टाकते. पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशात या घटना आपण पाहिल्या आहेत. काही दिवसांपासून सीआयए दक्षिण आशियात सुद्धा सक्रिय झाली आहे. भारतातही मोठी उलथापालथ करण्याचा डाव साधण्याचा प्रयत्न ही गुप्तहेर संघटना करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

ऑर्गनायजरने एक मोठा खळबळजनक दावा केला आहे. त्यानुसार, बांगलादेशाची राजधानी ढाकामध्ये अमेरिकेतील एका अधिकाऱ्याचा रहस्यमयी मृत्यू झाला. 31 ऑगस्ट रोजी ढाका येथील एका हॉटेलमध्ये त्याचा मृतदेह सापडला. अमेरिकन स्पेशल फोर्सचा अधिकारी टेरेंस अर्वेल जॅक्सन याचा गुढ मृत्यू झाला. या मृत्यूमुळे अमेरिका हादरली. दक्षिण आशियात मोठा घातपात करण्याचा डाव उधळल्याची चर्चा सुरू झाली.

अमेरिकन अधिकाऱ्याच्या मृत्यूचा तो खळबळजनक दावा

ऑर्गनायझरने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन सुरक्षा अधिकारी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी त्याला गेल्या काही दिवसांपासून ढाका येथे तैनात करण्यात आले होते. याची माहिती अगोदरच भारतीय गुप्तहेर संघटनांना मिळाली होती. भारत आणि रशियाच्या गुप्तहेर संघटनांनी संयुक्तपणे कारवाई केली. अमेरिकेचा आणि सीआयएचा डाव उधळून लावला. यामुळे ढाक्यातील सरकार सुद्धा हादरून गेले.

अमेरिकन अधिकारी टेरेंस अर्वेल जॅक्सन 31 ऑगस्ट रोजी ढाक्यातील एका हॉटेलमध्ये मृत आढळला. सेंट मार्टिन बेटावर बांगलादेशी लष्कराला प्रशिक्षण देण्याचे आणि भारतातील अस्थिर गटाला मदत करण्याची जबाबदारी जॅक्सनवर होती. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याची जबाबदारी पण त्याच्यावर असल्याचे समोर येत आहे.

ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघाई सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर संमेलनासाठी चीनच्या तियानजिन येथे होते. त्याच दिवशी ढाका येथे भारत आणि रशियाच्या गुप्तहेरांनी जॅक्सनला यमसदनाला पाठवल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान 2 सप्टेंबर रोजी भारतात परतल्यावर मोदींनी नवी दिल्लीत सेमीकॉन शिखर संमेलनात एक मोठे वक्तव्य केले होते. ‘मी चीनला गेलो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवत आहात की मी परत आलो म्हणून टाळ्या वाजवताय’, असा सवाल त्यांनी केला होता. त्याचा अर्थ आता लोकांना कळू लागला आहे.

टीव्ही 9 नेटवर्क या दाव्याला दुजोरा देत नाही. पण जर ऑर्गनायझरचा दावा जर खरा असेल तर भारत आणि अमेरिकेतील संबंधावर त्याचा विपरीत परिणाम नक्कीच दिसेल.

शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.