तब्बल 7 इंचांचा डिस्प्ले, 6000mAh बॅटरी, दमदार कॅमेरा आणि खूपच कमी, मेड इन इंडिया फोनची सर्वत्र चर्चा

| Updated on: May 12, 2021 | 10:53 PM

भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी लाव्हाने (LAVA) आपला नवीन स्मार्टफोन झेड 2 मॅक्स (Z2 Max) बाजारात सादर केला आहे.

तब्बल 7 इंचांचा डिस्प्ले, 6000mAh बॅटरी, दमदार कॅमेरा आणि खूपच कमी, मेड इन इंडिया फोनची सर्वत्र चर्चा
Lava Z2 Max
Follow us on

मुंबई : भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी लाव्हाने (LAVA) आपला नवीन स्मार्टफोन झेड 2 मॅक्स (Z2 Max) बाजारात सादर केला आहे. या फोनमध्ये कंपनीने मोठ्या स्क्रीनसह दमदार बॅटरी बॅकअपची सुविधा दिली आहे. देशात कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेने परिस्थिती पुन्हा बिघडवली आहे. अशातच ऑनलाईन शिक्षणास सपोर्ट करण्यासाठी कंपनीने हा फोन लाँच केला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. (LAVA India launched LAVA Z2 max with 7 inch display and 6000mAh battery)

LAVA Z2 Max मध्ये 7 इंचांचा एचडी + डिस्प्ले आणि 6000 एमएएच बॅटरी आहे. ग्राहक हा फोन कंपनीच्या ई-स्टोअरवर आणि प्रमुख ऑनलाइन तसेच ऑफलाइन चॅनेल्सच्या माध्यमातून अवघ्या 7,799 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतात. लाव्हा इंटरनॅशनलचे प्रॉडक्ट हेड तेजिंदर सिंह यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “LAVA Z2 Max च्या सहाय्याने आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य शिक्षण मिळावे आणि भविष्यात देशाच्या विकासाला हातभार लावावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.”

सिंह म्हणाले की, पुढील काळात ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार असून ते भारतातील शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग असेल. विद्यार्थ्यांनी डिजिटल शिक्षणात बदल करण्यास सुरवात केली आहे, जे त्यांना अधिक वैयक्तिक तसेच इंटरअॅक्टिव्ह होण्यास मदत करत आहे. तसेच अशा प्रकारे शिक्षण घेत असताना कोणतीही अडचण येत नाही.

LAVA Z2 Max चे फीचर्स

LAVA Z2 Max मध्ये ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन मीडियाटेक हेलिओ प्रोसेसरवर (MediaTek Helio processor) चालतो आणि 2 जीबी डीडीआर 4 एक्स रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये इनबिल्ट बॉक्स स्पीकर्स आहेत, जे अतिशय वेगवान आणि स्पष्ट ऑडिओ प्रस्तुत करतात.

परफेक्ट पॅकेज फोन

सिंग म्हणाले, लाव्हाच्या टीमने उत्पादनावर बरंच विचार-मंथन केलं आहे आणि वेगळ्या पद्धतीने हा फोन डिझाईन केला आहे, जेणेकरुन याचा वापर डिजिटल शिक्षणासह ऑनलाईन कामे करण्यासाठीदेखील या फोनचा वापर करता येईल. हा फोन एक संपूर्ण पॅकेज आहे आणि युजर्सना उत्कृष्ट अनुभव प्रदान करतो. हा फोन स्टॉक अँड्रॉइडने इनहॅन्स्ड केला आहे.

इतर बातम्या

22 हजारांचा फोन 6,999 रुपयांत, 16 हजारांचा फोन 8 हजारात, OPPO ची ढासू ऑफर

अवघ्या 1 रुपयात OPPO Band खरेदीची संधी, स्मार्टफोन्सवर 80% डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?

लॉकडाऊनमुळे स्मार्टफोन कंपन्या तोट्यात, जाणून घ्या तुमच्यावर काय परिणाम होणार

(LAVA India launched LAVA Z2 max with 7 inch display and 6000mAh battery)