AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

22 हजारांचा फोन 6,999 रुपयांत, 16 हजारांचा फोन 8 हजारात, OPPO ची ढासू ऑफर

ओप्पोने (Oppo) अलीकडेच आपले ई-स्टोअर लाँच केले आहे. त्याअंतर्गत कंपनी आपल्या स्मार्टफोनपासून ते सर्व उत्पादनांवर बंपर सवलत देत आहे.

22 हजारांचा फोन 6,999 रुपयांत, 16 हजारांचा फोन 8 हजारात, OPPO ची ढासू ऑफर
Oppo F11
| Updated on: May 12, 2021 | 7:57 PM
Share

मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने (Oppo) अलीकडेच आपले ई-स्टोअर लाँच केले आहे. त्याअंतर्गत कंपनी आपल्या स्मार्टफोनपासून ते सर्व उत्पादनांवर बंपर सवलत देत आहे. यात तुम्हाला OPPO चे सर्व स्मार्टफोन, इअरबड्स आणि स्मार्टवॉचवर हजारो रुपयांची सूट देण्यात येत आहे. (Buy Oppo F11 smartphone in just Rs 6999, know more about Oppo Bumper offer)

याशिवाय, यात असे काही स्मार्टफोन आहेत ज्यावर 68 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. यात आपण ओप्पोचा स्मार्टफोन केवळ 6,999 रुपयात खरेदी करू शकता, ज्याची मूळ किंमत 21,990 रुपये आहे. या फोनचे नाव ओप्पो एफ 11 (Oppo F11) असे आहे आणि यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे.

Oppo F11 चे फीचर्स

या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे झाले तर हा फोन पर्पल (जांभळा) कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असून यात 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे. यासह, पॉवर देण्यासाठी 4020mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 9 आधारित कलरओएस 6 वर चालतो. कॅमेर्‍याबद्दल सांगायचे तर, यात 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

पेमेंटचे सर्व पर्याय उपलब्ध

जर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, ईएमआय, डेबिड किंवा क्रेडिट कार्ड, वॉलेट, नेटबँकिंग किंवा यूपीआयद्वारे पैसे देता येतील. यात एचडीएफसी, कोटक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बॅंकेकडून 10 टक्के इन्स्टंट कॅशबॅक मिळू शकेल. फोन खरेदी केल्यावर तुम्हाला विनामूल्य डिलिव्हरी आणि 30 दिवसांची एक्सचेंज ऑफर मिळेल. यासह, 12 महिन्यांची वॉरंटी देखील देण्यात आली आहे.

16 हजारांचा फोन 8 हजारात

या स्मार्टफोनशिवाय आपण ओप्पो ओप्पो ई-स्टोअर वरून केवळ 7999 रुपयात OPPO A5 2020 हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असून त्याची मूळ किंमत 15990 रुपये आहे. याशिवाय ओप्पोच्या स्मार्टवॉच आणि बँडवर तुम्हाला सूट मिळेल. याव्यतिरिक्त, आपण बम्पर सवलतीत ओप्पो इअरबड्स देखील खरेदी करू शकता. त्यामध्ये एक रुपयाची फ्लॅश डीलही देण्यात येत आहे, ज्यामध्ये तुम्हाला अवघ्या एक रुपयात फिटनेस बँड आणि इअरबड्स मिळू शकतात.

संबंधित बातम्या

अवघ्या 1 रुपयात OPPO Band खरेदीची संधी, स्मार्टफोन्सवर 80% डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?

iPhone 12 सिरीजवर तगडा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

नवीन स्मार्टफोन दीर्घकाळ टिकवायचा आहे? मग या टिप्स नक्की वाचा

(Buy Oppo F11 smartphone in just Rs 6999, know more about Oppo Bumper offer)

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.