फक्त 11 हजार 999 रूपयांना लाँच झाला लावाचा 6000mAh बॅटरी असलेला फोन, जाणून घ्या जबरदस्त फिचर्स

लावा शार्क 2 5G भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये 120Hz डिस्प्ले, 6000mAh बॅटरी आणि क्लीन अँड्रॉइड 16 आहे. याची सुरुवातीची किंमत 11 हजार 999 रूपये आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनचे खास फिचर्स जाणून घेऊयात.

फक्त 11 हजार 999 रूपयांना लाँच झाला लावाचा 6000mAh बॅटरी असलेला फोन, जाणून घ्या जबरदस्त फिचर्स
phone
| Edited By: | Updated on: May 27, 2026 | 2:44 PM

तुम्हाला जर नवीन 5 जी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, पण तुमचं बजेट हे 15 हजार रूपयांपेक्षा कमी असल्यास चिंता करू नका. कारण लावाने मंगळवारी 26 मे रोजी भारतात त्यांचा नवीन बजेट 5जी स्मार्टफोन Lava SHARK 2 5G लाँच केला आहे. कंपनीने हा फोन मोठ्या बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि क्लीन अँड्रॉइड अनुभवासह सादर केला आहे. ज्या वापरकर्त्यांना कमी किमतीत पॉवरफुल फिचर्स हवे आहेत, त्यांना लक्षात घेऊन हा नवीन स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये मोठी 6000mAh बॅटरी आणि UNISOC T8200 प्रोसेसर आहे. तर या Lava SHARK 2 5G फोनची विक्री 10 जून 2026 पासून सुरू होईल. याची किंमत 11 हजार 999 रुपये असून, हा फोन देशभरातील रिटेल स्टोअर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनचे खास फिचर्स जाणून घेऊयात.

डिस्प्ले आणि डिझाइन

लावा शार्क 2 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.75-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे. कंपनीचा दावा आहे की यामुळे स्मूथ स्क्रोलिंग आणि गेमिंगचा अनुभव मिळेल. या फोनला IP64 रेटिंग आहे. डिझाइनच्या बाबतीत हा स्मार्टफोन सोनार गोल्ड आणि आर्या ब्लू या रंगांच्या पर्यायांमध्ये करण्यात आला आहे.

लावा शार्क 2 5G मध्ये ऑक्टा-कोअर 6nm UNISOC T8200 प्रोसेसर आहे. कंपनीचा दावा आहे की या फोनचा AnTuTu स्कोअर 500,000 पेक्षा जास्त आहे. या फोनमध्ये 4GB LPDDR4x रॅम आहे, जी व्हर्च्युअल रॅमद्वारे 8GB पर्यंत वाढवता येते. तसेच यात 64GB UFS 2.2 स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन क्लीन अँड्रॉइड 16 वर चालतो.

कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा एआय रिअर कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी फोनमध्ये मोठी 6000mAh बॅटरी आहे, जी दीर्घकाळ टिकण्याची हमी देते. हे 18W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते. लावाच्या मते, हे डिव्हाइस अंदाजे 13 तास ​​35 मिनिटांचा यूट्यूब प्लेबॅक आणि अंदाजे 12 तास 23 मिनिटांचा सतत स्क्रीन-ऑन टाईम देऊ शकते. फोनमध्ये बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G VoLTE, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यांचा समावेश आहे. फोनचे वजन 210 ग्रॅम आहे.

Follow Us