AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजच तुमचा आधारचा बायोमेट्रिक डेटा करा लॉक, जाणून घ्या ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी तुमचा आधार बायोमेट्रिक डेटा लॉक करणे महत्त्वाचे आहे. UIDAI वेबसाइट आणि आधार ॲपद्वारे तो सहजपणे लॉक आणि अनलॉक करता येतो, ज्यामुळे डेटाची सुरक्षा सुनिश्चित होते. चला तर डेटा लॉक करण्यासाठीची प्रोसेस जाणून घेऊयात.

आजच तुमचा आधारचा बायोमेट्रिक डेटा करा लॉक, जाणून घ्या ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस
| Edited By: | Updated on: Jul 30, 2026 | 9:16 PM
Share

आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. सायबर गुन्हेगार केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही लोकांची फसवणूक करत आहेत. अलीकडेच ऑनलाइन फसवणुकी मधील सर्वात सामान्य समस्या म्हणजे वापरकर्त्याच्या मोबाईलवर मिळालेला ओटीपी किंवा आधार बायोमेट्रिक तपशील लीक होणे. त्यातच या डिजिटल युगात आपण रेल्वे तिकीटांपासून ते बायोमेट्रिक आधार ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्येच वापरत आहोत. त्यातच आपला सर्वात महत्वाच ओळखपत्र हे आधारकार्ड आहे. तसेच सरकारी काम असो वा बँकेचे काम आधारशिवाय कोणतेही काम करणे अवघड आहे. त्यामुळे डेटा लीक होणे ही एक सामान्य बाब झाली आहे. डेटा लीक रोखण्यासाठी सरकारने आधार ॲपमध्ये माहिती लॉक आणि अनलॉक करण्याची सुविधा दिली आहे.

तर ही सुविधा आधार जारी करणारी संस्था UIDAI च्या अधिकृत वेबसाइट आणि आधार ॲपद्वारे सहजपणे वापरता येते. चला तर मग आजच्या लेखात आपण येथे स्टेप बाय स्टेप तुमचा आधारचा बायोमेट्रिक डेटा लॉक कसा करायचा ते जाणून घेऊयात.

UIDAI वेबसाइटवरून आधार बायोमेट्रिक या पद्धतीने लॉक करावे

सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाइट उघडा आणि ‘ My Aadhaar Section’ या विभागात जा.

त्यानंतर लॉगिन करण्यासाठी तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

आता तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी भरून लॉगिन करा.

आता तुम्हाला डॅशबोर्डवर ‘लॉक/अनलॉक बायोमेट्रिक’ हा पर्याय दिसेल. तुम्ही याच प्रक्रियेचा वापर करून तुमचे बायोमेट्रिक्स अनलॉक करू शकता. मात्र ते 10 मिनिटांनंतर आपोआप लॉक होते.

आधार ॲपद्वारे लॉक कसे करावे?

तुमच्या फोनमधील आधार ॲप उघडा आणि लॉग इन करा. येथे, ‘बायोमेट्रिक सेटिंग्ज’ या पर्यायावर टॅप करून तुम्ही तुमचा बायोमेट्रिक डेटा लॉक किंवा अनलॉक करू शकता.

बायोमेट्रिक्स डेटा लॉक करणे का महत्त्वाचे आहे?

आधार डेटावर वापरकर्त्याचे संपूर्ण नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी हे आवश्यक आहे. बँक खाते उघडण्यासाठी, सिम कार्ड खरेदी करण्यासाठी किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. हा डेटा लॉक करून, तुम्ही स्वतःला ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवू शकता. आधार बायोमेट्रिक्सचा वापर करून तुम्ही आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम (AePS) द्वारे तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकता. जर ते लॉक राहिले तर सायबर गुन्हेगार तुमचे बँक खाते हॅक करू शकणार नाहीत.

Follow Us
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?