मारुती सुझुकीच्या दोन नव्या कार लवकरच बाजारात येणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठी कारनिर्मिती  कंपनी मारुती सुझुकी इंडिया आगामी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये दोन नवे मॉडेल बाजारात आणणार आहे. कंपनीचे चेअरमन आर.सी. भार्गव यांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. वाहन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मारुती सुझुकीने सध्याच्या आर्थिक वर्षातही दोन नव्या गाड्या बाजारात आणल्या. सध्या कंपनी आपल्या गाड्यांना अपग्रेड करत आहे. नव्या सुरक्षा नियमांचे पालन […]

मारुती सुझुकीच्या दोन नव्या कार लवकरच बाजारात येणार
Follow us on

मुंबई : देशातील सर्वात मोठी कारनिर्मिती  कंपनी मारुती सुझुकी इंडिया आगामी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये दोन नवे मॉडेल बाजारात आणणार आहे. कंपनीचे चेअरमन आर.सी. भार्गव यांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. वाहन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मारुती सुझुकीने सध्याच्या आर्थिक वर्षातही दोन नव्या गाड्या बाजारात आणल्या. सध्या कंपनी आपल्या गाड्यांना अपग्रेड करत आहे. नव्या सुरक्षा नियमांचे पालन व्हावे यासाठी मारुती सुझुकी येणाऱ्या जून महिन्यापर्यंत आपल्या सर्व गाड्यांमध्ये एअरबॅग, सीट बेल्ट रिमाइंडर, रिव्हर्स पार्किंग सेंसरसारखे फीचर असतील.

याबाबत माहिती देताना भार्गव यांनी सांगितले की, “2019-20 मध्ये दोन नवे मॉडेल बाजारात आणले जातील. लवकरच कंपनी आपल्या नव्या मॉडेलची आवृत्ती बाजारात आणेल.”

मारुती सुझुकीचं नवं मॉडेल हे कंपनीच्या लोकप्रिय हॅचबॅक वॅगनआरचं नवीन व्हर्जन असू शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीने याआधी आपली एमपीवी अर्टिगा आणि सिडेन सियाजचं नवीन व्हर्जन बाजारात आणलं होतं. तर मागील वर्षी कंपनीने नवी स्विफ्ट कार लाँच केली होती.

हे नवे मॉडेल कुठले असेल, याची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नसली, तरी यांची विक्री कुठल्या शोरुमच्या माध्यमातून होणार आहे हे समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचं एक नवीन मॉडेल मारुती सुझुकीच्याच प्रिमीअम शोरुम नेक्साच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुसरं मॉडेल अरिना आऊटलेट्सच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध असेल. या नव्या मॉडेल्सकडून कंपनीला खूप आशा असल्याचं भार्गव यांनी सांगितलं.

सध्याच्या मॉडेल्सना नव्या सुरक्षा नियमांत बसवण्यासाठी मारुती सुझुकीच्या गाड्यांना अपग्रेड करण्यात येत आहे. या सर्व गाड्यांमध्ये एअरबॅग, सीट बेल्ट रिमाइंडर, रिव्हर्स पार्किंग सेंसरसारखे फीचर्स असतील. सध्या मारुती सुझुकीचे सात मॉडेल या नियमांच्या अंतर्गत येतात, असे मारुतीचे वरिष्ठ कार्यकारी इंजिनीअर सीवी रमन यांनी सांगितलं.

सरकारच्या आदेशानुसार, 1 जून 2019 पर्यंत सर्व वाहन बनवणाऱ्या कंपन्यांना आपल्या वाहनांमध्ये एअरबॅग, सीट बेल्ट रिमाइंडर आणि रिव्हर्स पार्किंग सेंसर हे फीचर देणे अनिवार्य असेल.