Amazon वरून डिलिव्हरी घेताना पॅकेटवरील हा गुलाबी ठिपका नक्की पहा, रंग बदलला तर समजा की काहीतरी गडबड

अमेझॉनने त्यांच्या पार्सलच्या सुरक्षिततेसाठी एक नवीन ट्रिक्स सुरू केले आहे. ज्यामध्ये एका खास गुलाबी ठिपक्यासह टेप वापरला जात आहे.तर या गुलाबी ठिपक्याचा अर्थ काय आहे आणि असे पॅकेज पाहिल्यानंतर तुम्ही काय करावे हे आजच्या लेखात जाणून घ्या.

Amazon वरून डिलिव्हरी घेताना पॅकेटवरील हा गुलाबी ठिपका नक्की पहा, रंग बदलला तर समजा की काहीतरी गडबड
| Edited By: | Updated on: Jun 07, 2025 | 5:07 PM

आजकाल डिजिटलच्या या युगात प्रत्येकजण ऑनलाईन शॉपिंग करत आहे. त्यात या ऑनलाईन शॉपिंगची क्रेज वाढतच चालेली आहे. पण दुसरीकडे या संबंधित समस्या देखील वेगाने वाढल्या आहेत. कारण डिलिव्हरीमध्ये चुकीच्या वस्तू मिळाल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्या आहेत. जर तुम्ही देखील Amazon वरून ऑनलाइन खरेदी करत असाल आणि तुमच्या महागड्या ऑर्डरमध्ये छेडछाड होण्याची चिंता सतावत असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण Amazon ने आता एक मोठे पाऊल उचलेले आहे. ज्यामध्ये त्यांच्या पार्सलच्या सुरक्षिततेसाठी एक नवीन स्मार्ट तंत्रज्ञान सादर केले आहे, ज्यामुळे कोणतीही छेडछाड त्वरित लक्षात येणार आहे.

हे नवीन सुरक्षा तंत्र काय आहे?

अमेझॉनने आता त्यांच्या पॅकेजिंग प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी छेडछाड प्रतिरोधक तंत्रज्ञान सादर केले आहे. या नवीन तंत्रज्ञानाअंतर्गत पॅकेजेसमध्ये विशेष सीलिंग टेप ( Amazon package protection sealing tape ) वापरली जात आहे. या टेपवर लहान गुलाबी आणि लाल ठिपके आहेत. आता जर कोणी पार्सल उघडण्याचा प्रयत्न केला, विशेषतः हीट गन किंवा हीटच्या मदतीने, तर हे ठिपके रंग बदलतात आणि पॅकेजमध्ये छेडछाड झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. कोणी कितीही हुशारीने पॅकेज उघडले तरी आता तो ते लपवू शकणार नाही.

गुलाबी ठिपका दिसला तर काय करावे?

सर्वप्रथम पार्सलचा फोटो किंवा व्हिडिओ काढून ठेवा. कारण हा पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो.

याशिवाय जर गुलाबी ठिपका स्पष्ट दिसत असेल तर पार्सल घेण्यास नकार द्या.

ताबडतोब Amazon ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि तक्रार नोंदवा.

अमेझॉनच्या मते, जर कोणत्याही पॅकेजमध्ये असा ठिपका दिसला तर ग्राहकाला तो कोणत्याही संकोचाशिवाय नाकारण्याचा अधिकार आहे.

हे पाऊल का आवश्यक आहे?

गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तसेच अनेकदा तुम्ही ऐकले असेल की एखाद्याने ऑनलाइन सेल दरम्यान लाखो रुपयांचा फोन किंवा लॅपटॉप ऑर्डर केला आहे. मात्र जेव्हा पॅकेज उघडले जाते तेव्हा त्यात साबणाचा बार किंवा वीट आढळते. अशा परिस्थितीत Amazon चा हा निर्णय ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवण्यास मदत करेल. यामुळे फसवणूक टाळता येईल.

पण ग्राहकांना फक्त हे लक्षात ठेवावे लागेल की जेव्हा जेव्हा कोणतीही मौल्यवान ऑर्डर येते तेव्हा प्रथम ठिपके तपासा आणि त्यानंतरच पार्सल घ्या.