AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi Video: मोदींचा व्हिडिओ उडवल्याने राजधानीत खळबळ; थेट मेटाच्या ग्लोबल हेडला बोलावलं; काय घडतंय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ आता मेटाने फेसबुकवरुन चुकुन डिलीट केल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर मेटाने यासंदर्भातील आपली चूक मान्य केली आहे. पण आता यासंदर्भात मेटाचे ग्लोबल हेड यांना या प्रकरणात लक्ष घालावे लागणार असल्याचे दिसत आहे.

Narendra Modi Video: मोदींचा व्हिडिओ उडवल्याने राजधानीत खळबळ; थेट मेटाच्या ग्लोबल हेडला बोलावलं; काय घडतंय?
| Updated on: Jul 28, 2026 | 1:14 PM
Share

मगील दोन ते तीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सेल्फीमोड कॅमरा सेट करुन व्हिडिओ शूट केले होते. नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी असा व्हिडिओ शूट केला. Gen Z ज्या पद्धतीने व्हिडिओ शूट करतात अगदी त्याच पद्धतीने मोदी यांनी व्हिडिओ शूट केला आणि तो अपलोड केला होता. मोदी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मोदी यांच्या व्हिडिओ खूप चर्चा ही झाली पण आता तोच एक व्हिडिओ मेटाने चुकून फेसबुकवरुन डिलीट केला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुकवर पोस्ट केलेला एक व्हिडिओ काढून टाकला होता. नंतर कंपनीने ही एक चूक असल्याचे सांगून तो व्हिडिओ पुन्हा पूर्ववत केला.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर लगेचच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटाच्या जागतिक सार्वजनिक धोरण प्रमुखांना (फेसबुक आणि इंस्टाग्राम) म्हणजे ग्लोबल हे़डला बोलावले होते.

मंगळवारी, मेटाने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ ब्लॉक करण्यासंदर्भात एक निवेदन जारी केले, ज्यात म्हटले आहे की “कंटेंट चुकून काढून टाकण्यात आला होता. व्हिडिओ आता पूर्ववत करण्यात आला आहे.” ANI च्या अहवालानुसार, मेटाने फेसबुकवरून पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ काढून टाकला. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, मेटाला ही बाब तात्काळ लक्षात आल्याने ती पटकन त्यांनी सुधरवली आणि पुन्हा तो पुवर्वत केला. पण आता MeitY (Ministry of Electronics and Information Technology) ने मेटाच्या ग्लोबल पब्लिक पॉलिसी हेडला समन्स पाठवले आहे. पूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

मेटाचे स्पष्टीकरण आणि प्रश्न मेटाने आपली चूक मान्य करणारे अधिकृत निवेदन जारी केले, परंतु एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर एवढी मोठी चूक कशी होऊ शकते, असा प्रश्न आता यूजर विचारत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, एआय-आधारित सामग्री फिल्टरिंग कधीकधी चुका करतात, विशेषतः उच्च-प्रतिष्ठित लोकांच्या अकाउंटसबाबत. भारतासारख्या देशात, जिथे राजकारण, निवडणुका आणि जनजागृतीसाठी सोशल मीडिया हे एक प्रमुख माध्यम आहे, तिथे प्लॅटफॉर्म्सनी अधिक सतर्क राहिले पाहिजे. या घटनेमुळे मेटा आणि इतर कंपन्यांनी भारत सरकारसोबत अधिक चांगला समन्वय साधण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Follow Us
BRICS परिषदेसाठी दिल्ली सज्ज, पुतिन जिनपिंग मोदींच्या भेटीकडे लक्ष
BRICS परिषदेसाठी दिल्लीत मोठ्या हालचाली, पुतिन जिनपिंग आणि PM मोदींच्या भेटीकडे लक्ष
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार नाही, आता...
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुक..
नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुकीत
शारीरिक व्याधी बऱ्या करण्याचे आमिष दाखवून...
सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली... पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर