.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Down: सर्व्हिस ठप्प झाल्याने हजारो युजर्स अडचणीत, तुमच्याही स्क्रीनवर दिसत आहे, Server Error

Google Down: भारतातच नाही तर, देशभरात गुगल वापरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. अनेकांचं काम तर गुगलवर आधारलेलं असतं. पण गुगलची सर्व्हिस ठप्प झाल्याने त्याचा परिणार युजर्सच्या कामाला झाला. स्क्रिनवर सतत Server Error असं येत होतं...

Google Down:  सर्व्हिस ठप्प झाल्याने हजारो युजर्स  अडचणीत, तुमच्याही स्क्रीनवर दिसत आहे, Server Error
| Updated on: May 12, 2026 | 2:00 PM
Share

Google Down: भारतात असंख्य युजर्स गुगल वापरतात. अशात भारतातील हजारो यूजर्सना गूगल सर्च वापरताना समस्यांना सामोरं जावं लागलं. काहींच्या स्क्रिनवर एरर मेसेजेस आला. तर काहींनी ब्लँक पेजेस आणि सर्च रिझल्ट्स व्यवस्थित लोड न झाल्याची तक्रार केली. आउटेज-ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म ‘डाउनडिटेक्टर’नुसार, नुकताच तक्रारींमध्ये अचानक मोठी वाढ झाली असून, 3 हजार 300 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. बहुतेक तक्रारी गूगल सर्चशी संबंधित होत्या, तर अनेक यूजर्सनी पेज लोड होण्यात आणि वेबसाइट्स वापरण्यातही समस्या येत असल्याची तक्रार केली.

गुगलची सेवा बंद पडताच, ही समस्या फक्त आपल्यालाच येत आहे की काय हे पाहण्यासाठी वापरकर्त्यांनी एक्स (X) आणि रेडिट (Reddit) सारख्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने धाव घेतली, पण तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, त्याच वेळी इतर हजारो लोकांनाही तीच समस्या भेडसावत होती. जेव्हा गुगल क्रॅश होतं, तेव्हा लोकांना अचानक जाणवतं की इंटरनेटचा किती मोठा भाग गुगलच्या योग्य कार्यावर अवलंबून आहे. बऱ्याच युजर्ससाठी हा व्यत्यय तात्पुरता होता, तरीही या सेवेतील व्यत्ययाबद्दलच्या तक्रारी झपाट्याने वाढतच गेल्या.

57 टक्के लोकांना आली ही अडचण….

डाउनडिटेक्टर डेटानुसार, 57 टक्की लोकांना गूगल सर्च संबंधी अडचणींचा सामना करावा लागला… 28 टक्के लोकांनी पेजेस लॉक न होण्याबद्दल तक्रार केली. 11 टक्के लोकांना वेबसाइटशी संबंधित समस्या आल्या. गूगलने अद्याप या व्यत्ययामागील कारण उघड केलेल नाही, याबद्दल अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल असं देखली सांगण्यात आहे.

अशात गुगल डाऊन झाल्यामुळे शोशल मीडियावर नेटकरी कमेंट करत स्वतःचं मत व्यक्त करत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मला विश्वास होत नाही की, गुगल डाऊन होऊ शकतो… पण Google.com खरंच डाऊन झालं आहे… ‘, अन्य एक नेटकरी म्हणाला, माझ्या लक्षात नाही यापूर्वी असं कधी झालं होतं…

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर