AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय…’; भर अधिवेशनात सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी TET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. "आधीच राज्यातील तरुण आपल्यावर प्रचंड ओरडतोय, जर पोलीस इन्स्पेक्टरने वेळीच कारवाई केली नसती तर परीक्षा झाल्यावर मोठी बोंबाबोंब झाली असती," अशी थेट कबुली देत त्यांनी ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय...'; भर अधिवेशनात सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar on TETImage Credit source: Google
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: Jun 29, 2026 | 6:01 PM
Share

आज भर अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी TET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारला खडेबोल सुनावले. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी TET पेपरफुटीवर अधिवेशनात निवेदन दिले, यानंतर मुनगंटीवर यांनी थेट सरकारवरच निशाणा शाधला. ‘आधीच राज्यातील तरुण आपल्यावर प्रचंड ओरडतोय, जर पोलीस इन्स्पेक्टरने वेळीच कारवाई केली नसती तर परीक्षा झाल्यावर मोठी बोंबाबोंब झाली असती,’ अशी थेट कबुली त्यांनी दिली.

भर विधानसभेत मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी TET पेपरफुटीवर अधिवेशनात निवेदन दिल्यानंतर यानंतर सुधीर मुनगंटीवर यांनी भाष्य केलं. ते म्हणालेत की, ‘पैसे ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या नाशिकची निवड करतात आणि प्रश्नपत्रिका छापतात त्या आग्र्याला, हे बंद करून राज्यातच प्रश्नपत्रिका छापाव्यात. या गुन्ह्यात किंवा पेपर फोडण्यात महाराष्ट्राचा माणूस नाही. याचा अर्थ असाही झाला की तिजोरीत पैसा ठेवले आणि तिजोरीला चावीच नाही. आता त्या इन्सपेक्टरचं अभिनंद. कारण त्याने लगेच कारवाई केली. अन्यथा, परीक्षा झाल्यावर जर बोंबाबोंब झाली असती तर आधीच आपल्यावर तरूण ओरडतो नंतर आणखी ओरड झाली असतं, असं भाजपचे ज्येष्ठ नते सुधीर मुनगंटीवर भर अधिवेशनात म्हणालेत आणि आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला.

सुधीर मुनगंटीवर भाजपर का नाराज आहेत?

महायुतीचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. ते भाजपचे अत्यंत ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री राहिलेले आहेत. अशा वजनदार नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवल्याने ते नाराज असल्याचे बोलले जाते.

सापळा रचून आरोपींना अटक

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी TET पेपरफुटीवर अधिवेशनात निवेदन की, टीईटी पेपर फुटीबाबत माहिती मिळतात, पेपर विक्री करण्सासाठी येणाऱ्या तिघांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे टीईटीचे पेपर आढळले. ⁠राजू प्रयाग शाम आणि आणखी दोघांवर भिवंडी कोनगाव येथे गुन्हा दाखल केला आहे.

पुढील वर्षीपासून परीक्षा ऑनलाईन?

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले की, मोठी रक्कम घेऊन हे पेपर विक्री करणार होते. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना 27 तारखेला अटक केली आहे. पोलिस आयुक्त गुन्हे ठाणे यांची एसआयटी स्थापन केली आहे.

हरियाणा, बिहार आणि दिल्लीला तपासासाठी पथके

हरियाणा, बिहार आणि दिल्लीला तपासासाठी पथके रवाना झाले आहे. या प्रकरणात मकोका लावण्याच्या संदर्भात तपासणी सुरु आहे. आता फेर पेपरसाठी कोणताही शुल्क घेतल जाणार नाही. पुढील परीक्षा पारदर्शक आणि ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात