AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Motorola Phones: 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह मोटोरोलाचा नवीन फोन लाँचिंगसाठी सज्ज

Motorola Phones Under 15000: मोटोरोला (Motorola) कंपनी भारतीय मोबाइल बाजारात एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे, जो किफायतशीर सेगमेंटमधील स्मार्टफोन (Affordable Segment SmartPhone) असेल.

Motorola Phones: 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह मोटोरोलाचा नवीन फोन लाँचिंगसाठी सज्ज
Motorola Moto G22Image Credit source: Flipkart
| Updated on: Apr 07, 2022 | 11:30 AM
Share

Motorola Phones Under 15000: मोटोरोला (Motorola) कंपनी भारतीय मोबाइल बाजारात एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे, जो किफायतशीर सेगमेंटमधील स्मार्टफोन (Affordable Segment SmartPhone) असेल. या मोबाईलचं नाव मोटो जी22 (Moto G22) असं असेल. हा मोबाईल 8 एप्रिल रोजी लाँच होणार आहे, याबाबतची अधिकृत घोषणा नुकतीच झाली आहे. या मोबाइल फोनच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असेल, या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. लेनोवोच्या मालकीची कंपनी यामध्ये मॅक्स व्हिजन डिस्प्ले देईल. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे, वेबसाईटवर या स्मार्टफोनच्या नावासमोर Coming Soon असं लिहिलं आहे.

Motorola च्या Moto G22 स्मार्टफोनची संभाव्य किंमत 10-15 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते, या फोनमध्ये अनेक खास फीचर्स पाहायला मिळणार आहेत. या स्मार्टफोनला बाजारात रेडमी, रियलमी आणि सॅमसंगच्या स्मार्टफोन्सशी तगडी स्पर्धा द्यावी असेल. या सेगमेंटच्या अनेक फोनमध्ये 5G सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

मोटोरोला मोटो जी 22 चे सपेसिफिकेशन्स

Motorola च्या Moto G22 च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचांचा सेंटर पंच होल कटआउट आहे, जो HD Plus डिस्प्ले सह येईल. यामध्ये 90Hz चा रिफ्रेश रेट वापरण्यात आला आहे. जो गेमिंग आणि स्क्रोलिंगमचा उत्तम एक्सपीरियन्स देतो. हा स्मार्टफोन Helio G37 चिपसेटसह येईल आणि त्यात Android 12 आधारित ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.

मोटोरोला मोटो जी 22 चा कॅमेरा सेटअप

Motorola Moto G22 च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, तर यात 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तसेच इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सल्सचे आहेत, जे डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीने या फोनमध्ये 16 मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप दिला आहे.

मोटोरोला मोटो जी 22 मध्ये 5000 mAh बॅटरी

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 20W फास्ट चार्जिंगसह येईल. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो लॉक केलेला स्मार्टफोन बायोमेट्रिक पद्धतीने अनलॉक करण्याचे काम करतो. कंपनी यामध्ये बिझनेस ग्रेड सिक्युरिटी थिंक शील्ड वापरणार आहे, ज्यामुळे यूजर्सना चांगली सुरक्षा मिळू शकेल.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.