AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिलायन्स जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी JioHotstar सबस्क्रिप्शन मिळणार स्वस्त दरात, जाणून घ्या

तुम्ही जिओ वापरकर्ता असाल तर तुम्हाला फायदाच फायदा, कारण मुकेश अंबानी त्यांच्या जिओ वापरकर्त्यांना 90 दिवसांच्या वैधतेसह स्वस्त दरात जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन देत आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटाचाही फायदा मिळत आहे.

रिलायन्स जिओच्या 'या' प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी JioHotstar सबस्क्रिप्शन मिळणार स्वस्त दरात, जाणून घ्या
Mukesh ambani Reliance Jio plan offer 90 days jio hotstar subscription freeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 16, 2025 | 9:20 PM
Share

रिलायन्स कंपनी ही भारतात सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कारण या कंपनीचे सर्वात जास्त यूजर्स असून टॉप कंपन्यानपैकी एक आहे. यासाठी रिलायन्स जिओ ही टेलिकॉम कंपनी आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी दमदार प्लॅन आणते. ज्यामुळे वापरकर्त्यांना बरेच फायदे मिळत राहतील. त्यातच रिलायन्स जिओने त्यांच्या युजर्ससाठी नवीन व सर्वांना खरेदी करता येईल असा स्वस्त प्लॅन लॉंच केला आहे. यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्लॅननंतर तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारचे वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्हाला प्लॅनमध्येच 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचा अॅक्सेस मिळतो. ज्यामध्ये तुम्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या प्रीमियम कंटेंटचा आनंद घेऊ शकता. तुम्ही रिअॅलिटी शो पाहू शकता आणि लाईव्ह क्रिकेट सामन्यांचा आनंद घेऊ शकता. या जिओ प्लॅनमध्ये तुम्हाला इतर कोणते फायदे मिळत आहेत आणि या प्लॅनची ​​किंमत किती आहे याची संपूर्ण आपण या लेखातुन जाणून घेऊयात…

जिओचा 100 रुपयांचा डेटा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधता मिळते. ज्यामध्ये तुम्ही एकूण 5 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला हाय स्पीड डेटा सुविधा देखील मिळत आहे. या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे तुम्ही संपूर्ण ९० दिवसांसाठी जिओ हॉटस्टारवर प्रीमियम कंटेंट पाहू शकता. तुम्ही लाईव्ह क्रिकेट सामन्यांचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कोणताही वेगळा प्लॅन घेण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला एकाच योजनेत ओटीटीचा अनेक फायदे मिळत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला मोबाईल आणि टीव्ही दोन्हीचा अॅक्सेस मिळतो. तुम्ही हॉटस्टारमध्ये तुम्हाला हवे ते लॉगिन करू शकता.

जिओचा 195 रुपयांचा प्लॅन

जिओचा हा क्रिकेट डेटा पॅक तुम्हाला अनेक फायदे देत आहे. या प्लॅनमध्येही तुम्हाला 90 दिवसांची वैधता मिळत आहे. पण या प्लॅनमध्ये तुम्हाला 100 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत जास्त डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 15 जीबी डेटा मोफत मिळतो. ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय हाय स्पीड डेटाचा लाभ घेऊ शकता. याशिवाय या योजनेत तुम्हाला 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचे मोफत मोबाईल सबस्क्रिप्शन मिळत आहे. यामध्ये तुम्ही मोबाईलवर प्रीमियम कंटेंट, चित्रपट, मालिका आणि लाईव्ह क्रिकेट सामने पाहू शकता.

15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल.
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने.
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर.