AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Audi Q3 SUV : न्यू जनरेशनची ऑडी Q3 भारतात होणार लाँच, काय आहेत स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या…

ऑडीची लक्झरी एसयुव्ही असलेली ऑडी Q3 च्या नवीन जनरेशनच्या प्रीमियम व्हर्जनमध्ये Q8 प्रमाणेच डिझाइन आणि नवीन टेक्नॉलॉजीवर आधारीत असलेले इंटीरियर मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने ही टेक्नॉलॉजी फोक्सवॅगनच्या MQB प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केली आहे. अपकमिंग एसयूव्ही सणासुदीच्या दिवसांमध्ये ग्राहकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Audi Q3 SUV : न्यू जनरेशनची ऑडी Q3 भारतात होणार लाँच, काय आहेत स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या...
| Edited By: | Updated on: Aug 09, 2022 | 2:50 PM
Share

मुंबई :  जर्मनीची लोकप्रिय लक्झरी कार कंपनी असलेल्या ऑडीने (Audi) नुकतीच नवीन A8L फेसलिफ्ट कार भारतीय बाजारात लाँच केली आहे. आता कंपनी भारतात आणखी एक नवीन कार आणणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनी नेक्स्ट जेन 2022 ऑडी क्यू 3 एसयुव्ही (Audi Q3 SUV) भारतात लाँच करू शकते. या कारला इंटरनेटवर लाँच होण्याआधी देखील पाहण्यात आले आहे. ऑडी Q3 चे नवीन मॉडेल 2019 मध्ये ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आले होते परंतु कोरोनामुळे (covid) त्याचे भारतात लाँचिंग थांबवण्यात आले होते. बीएस 6 उत्सर्जन नियम लागू झाल्यानंतर ऑडीने आपल्या लाइनअपमध्ये संपूर्ण बदल करण्याची घोषणा केली होती. नवीन ऑडी Q3 मर्सिडीज GLA, BMW X1 आणि Volvo XC40 शी स्पर्धा करेल.

कशी असेल डिझाइन

ऑडी क्यू 3 चे 2022 मॉडेल फ्रंट एंड डिझाइनसह उपलब्ध होणार आहे. कारची डिझाइन लक्झरी ब्रँड ऑडी Q8 एसयुव्हीने प्रेरित आहे. हे मॉडेल फोक्सवॅगनच्या MQB प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहे. नवीन ऑडी Q3 अपडेटेड व्हीलबेससह जुन्या मॉडेलपेक्षा लांब आणि रुंद असणार आहे. प्रीमियम एसयुव्हीला DRLs सह मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प, समोरच्या बंपरच्या तळाशी मोठे ग्रिल आणि हेक्सागोनल फॉग लॅंप मिळण्याची शक्यता आहे.

फीचर्स

नवीन Audi Q3 SUV चे इंटीरियर पूर्णपणे बदलण्यात आले आहे. ग्राहकांना यामध्ये एक नवीन केबिन मिळेल त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तंत्रज्ञानावर आधारित फीचर्सचा वापर करण्यात आलेला असेल. अपकमिंग कारमध्ये 10.25 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिसप्ले, 10.1 इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन मिळू शकतो. याशिवाय, लक्झरी ब्रँड ऑडी Q3 च्या नवीन मॉडेलमध्ये 360 डिग्री कॅमेरा आणि क्रूझ कंट्रोल आणि पार्क असिस्ट सारख्या ड्रायव्हर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे.

1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन

ग्लोबल मार्केटमध्ये ऑडी Q3 चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन, 2.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 2.0 लीटर डिझेल इंजिनसह उपलब्ध होते. ऑटोकारच्या मते, भारतातील हे मॉडेल 190hp, 2.0 लिटर चार सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आणि AWD 7 स्पीड DCT गियरबॉक्ससह येऊ शकते. नवीन ऑडी Q3 मर्सिडीज GLA, Volvo XC40 आणि BMW X1 शी स्पर्धा करेल.

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.