AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Helix Metalfit 3.0 Smartwatch लॉंच, बॉडी टेंपरेचरसह अनेक फीचर्स उपलब्ध

जर तुम्ही परवडणाऱ्या किमतीतील स्मार्टवॉच शोधत असाल तर Helix Metalfit 3.0 Smartwatch हा एक चांगला पर्याय आहे. या स्मार्टवॉचची किंमत, त्याची वेगवेगळी फीचर्स याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Helix Metalfit 3.0 Smartwatch लॉंच, बॉडी टेंपरेचरसह अनेक फीचर्स उपलब्ध
| Edited By: | Updated on: Aug 09, 2022 | 1:53 PM
Share

टायमेक्स कंपनीद्वारे (Timex Company) भारतीय बाजारात हेलिक्स मेटलफिट 3.0 स्मार्टवॉच ( Helix Metalfit 3.0 Smartwatch) सादर करण्यात आले आहे. हे स्मार्टवॉच परवडणाऱ्या किमतीतील आहे. विशेष म्हणजे या स्मार्टवॉचमध्ये अनेक स्पोर्ट्स मोड्स, (Sports Modes) डस्ट ॲंड वॉटर रेझिस्टन्ससाठी (Dust and Water resistance) आयपी 67 रेटिंग आणि टेंपरेचर सेन्सर सारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. या स्मार्टवॉचची बाजारातील किंमत, त्याची स्पेसिफिकेशन्स (features and specifications) काय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या स्मार्टवॉचची खरी किंमत 3999 रुपये इतकी आहे. मात्र सध्या हे स्मार्टवॉच 2995 रुपयांच्या स्पेशल किमतीमध्ये उपलब्ध आहे. मात्र ही सूट अजून किती काळासाठी असेल, याबद्दल कंपनीकडून अधिक माहिती मिळालेली नाही. ग्राहकांसाठी हे स्मार्टवॉच निळा, काळा, गुलाबी आणि ग्रे (करडा) या ( Blue, Black, Pink and Grey color) चार रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Helix Metalfit 3.0 स्पेसिफिकेशन

टायमक्स कंपनीद्वारे लाँच करण्यात आलेल्या हेलिक्स मेटलफिट 3.0 स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यामध्ये 240 ×280 पिक्सेल रिझोल्यूशन मिळते. हे स्मार्टवॉच मेटल केससह उपलब्ध आहे. कंपनीच्या सांगण्यानुसार, ग्राहकांना या स्मार्टवॉचसोबत 100 हून अधिक वॉच फेस कस्टमाइज करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. हेल्थ फीचर्सबाबत (Health Features) सांगायचे झाले तर या स्मार्टवॉचमध्ये ब्लड प्रेशर मॉनिटर, हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकिंग, टेंपरचेर मॉनिटर आणि ब्लड ऑक्सीजन लेव्हल यासारखी अनेक फीचर्स मिळतील.

बॅटरी लाईफबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने असा दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर हे स्मार्टवॉच सात दिवसांपर्यंत चालू शकते. तसेच या स्मार्टवॉचद्वारे तुम्ही म्युझिक आणि कॅमेरा नियंत्रित करू शकता. हे वेअरेबल स्मार्टवॉच भारतातच तयार करण्यात आले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.