Nokia : या दोन फोनच्या किमतीत भरघोस कपात

नोकियाचा स्मार्टफोन घेण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. एचएमडी ग्लोबलने भारतात आपल्या दोन स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. यात Nokia 7.1 आणि Nokia 6.1 Plus चा समावेश आहे.

Nokia : या दोन फोनच्या किमतीत भरघोस कपात


मुंबई : नोकियाचा स्मार्टफोन घेण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. एचएमडी ग्लोबलने भारतात आपल्या दोन स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. यात Nokia 7.1 आणि Nokia 6.1 Plus चा समावेश आहे.

या कपातीनंतर नोकिया 7.1 ची किंमत 12,999 रुपये आणि नोकिया 6.1 प्लसची किंमत 11,999 रुपये झाली आहे. नोकिया 6.1 प्लसमध्ये 6 जीबी रॅम वेरिअंटची किंमत 14,999 रुपये झाली आहे. नोकिया 7.1 चे भारतात लाँचिंग झाले तेव्हा किंमत 17,999 रुपये होती.

नोकिया 6.1 प्लसचे स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये अँड्रॉईड ओरियो 8.1, ड्युअल सिम सपोर्ट आणि 5.8 इंचची फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. त्याचे रिझॉल्युशन 1080×2280 पिक्सल आहे. तसेच त्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चं संरक्षण आहे. फोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर, ग्राफिक्ससह Adreno 509, 4 जीबी रॅम आणि 64 जीबीचे स्टोरेज आहे. हे स्टोरेज 400 जीबीपर्यंत वाढवता येणार आहे.

नोकिया 7.1 चे स्पेसिफिकेशन

हा फोन ड्युअल सिम सपोर्ट आहे. यात अँड्रॉईड ओरियाचं अँड्रॉईड वन व्हर्जन मिळणार आहे. नोकिया 7.1 मध्ये 5.84 इंचचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. त्याचं रिझॉल्युशन 1080×2280 पिक्सल आणि आस्पेक्ट रेशो 19:9 आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चं संरक्षण आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबीचे स्टोरेज मिळेल. हे स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने 400 जीबीपर्यंत वाढवता येईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI