12 मेगापिक्सेलचे तब्बल 5 कॅमेरे, नोकियाचा नवा स्मार्टफोन लॉन्च

मुंबई : नोकिया (Nokia) कंपनीने Nokia 9 PureView हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 2019 च्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या आधीच HMD Global मध्ये रविवारी नोकियाने नवा स्मार्टफोन बाजारात आणला. नोकिया 9 प्युअर व्ह्यू स्मार्टफोनची सर्वात आकर्षणाची गोष्ट म्हणजे कॅमेरा. या स्मार्टफोनला तीन मोनोक्रोम आणि दोन आरजीबी लेन्स रिअर कॅमेरे देण्यात आहेत. 5.99 इंच स्क्रीन असलेल्या […]

12 मेगापिक्सेलचे तब्बल 5 कॅमेरे, नोकियाचा नवा स्मार्टफोन लॉन्च
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई : नोकिया (Nokia) कंपनीने Nokia 9 PureView हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 2019 च्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या आधीच HMD Global मध्ये रविवारी नोकियाने नवा स्मार्टफोन बाजारात आणला. नोकिया 9 प्युअर व्ह्यू स्मार्टफोनची सर्वात आकर्षणाची गोष्ट म्हणजे कॅमेरा. या स्मार्टफोनला तीन मोनोक्रोम आणि दोन आरजीबी लेन्स रिअर कॅमेरे देण्यात आहेत. 5.99 इंच स्क्रीन असलेल्या या स्मार्टफोनचं प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 असून, रॅम 6 जीबी आहे.

फोटोग्राफर्ससाठी खास फोन

Nokia 9 PureView स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याला विजेच्या प्रभावानुसार तयार करण्यात आले आहे. एकूण पाच कॅमेऱ्या या स्मार्टफोनमध्य असून, त्यातील तीन 12 मेगापिक्सेलचे मोनोक्रोम सेन्सर्स आणि उर्वरित 2 कॅमेरे 12 मेगापिक्सेलचेच आहेत, मात्र आरजीबी सेन्सर्सचे आहेत. पाचही लेन्स युजर्सना वापरता येणार आहेत. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. एकंदरीत ज्यांना फोटो काढण्याची आवड आहे, त्यांच्या हा स्मार्टफोन पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.

किंमत किती?

एचएमडी ग्लोबलच्या माहितीनुसार, “Nokia 9 Pure View स्मार्टफोनची किंमत 699 डॉलर असेल. म्हणजेच, भारतीय रुपयात ही किंमत जवळपास 49 हजार 700 रुपयांपर्यंत जाईल. पुढच्या आठवड्यापासून जगातील काही निवडक बाजारपेठांमध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हा स्मार्टफोन भारतातील स्मार्टफोनप्रेमींसाठी कधीपासून उपलब्ध करण्यात येईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Nokia 9 Pure View चे फीचर्स :

  •  5.99 इंचाचा क्वाड एचडी+ (1440×2960 पिक्सेल) AMOLED स्क्रीन
  • इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर
  • 6 जीबी रॅम
  • 128 जीबी इंटरनल स्टोरेज
  • 3,320 mAh क्षमतेची बॅटरी (वायरलेस चार्जिंग सपोर्ट)
  • वाय-फाय, ब्लूटूथ आणि एनएफसी सारखे कनेक्टिव्हिटी फीचर
Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.