VIDEO : आता फक्त 11 हजारात बुक करा नवीन वॅगनआर

VIDEO : आता फक्त 11 हजारात बुक करा नवीन वॅगनआर


मुंबई : नवीन वॅगनआर लाँच होताच मार्केटमध्ये एकच धुमाकूळ सुरु आहे. 2019 मारुती सुझुकी वॅगनआरच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. तुम्ही मारुती सुझुकीच्या अधिकृत वेबसाईटवरुन बूक करु शकता. विशेष म्हणजे ही कार तुम्ही फक्त 11 हजार रुपयात बुक करु शकता. मारुती सुझुकीच्या नवीन वॅगनआर कारचा टीझर व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात सर्व माहिती दिली आहे.

नवीन मारुती वॅगनआर 23 जानेवारीला लाँच होणार आहे. ही कार स्विफ्ट, बलेनो आणि नवीन आर्टीगाप्रमाणे सुझुकीच्या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मच्या आधारावर बनवण्यात आली आहे. यामुळे नवीन वॅगनआर कार सध्याच्या वॅगनआरपेक्षा 50-65 किलोग्राम वजनाने कमी आहे. तसेच नवीन कारचा मॉडलही मोठा आहे. या कारची व्हीलबेस 35mm जास्त आणि लांबी 125mm ने जास्त आहे. नवीन मॉडलमध्ये अनेक फीचर्सही देण्यात आले आहेत.

इंजिन

मारुतीच्या नवीन वॅगनआर कारला दोन इंजिन ऑप्शन दिले आहेत. यामध्ये एक स्विफ्टवाले इंजिन 1-2 लीटर, 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल जे 83hp चे पॉवर आणि 113nm टॉर्क जनरेट करेल. तर सध्याच्या मॉडलमध्ये 1.0 लीटर इंजिन, दोन्ही इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ऑप्शन आहेत.

पाहा व्हिडीओ :

 

फीचर्स

नवीन वॅगनआरच्या सर्व व्हेरिऐंटमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला एअरबॅग, ईबीडीसोबत एबीएस आणि रिअर पार्किंग सेंसर आहेत. टॉप व्हेरिऐंटमध्ये पॅसेंजर शेजारी एअरबॅग्स, ईलेक्ट्रॉनिक अॅडजस्टटेबल आऊट साईड रिअर व्ह्यू मिरर आणि अँड्रॉईड ऑटो अॅपल कारप्लेसह 7 इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे.

व्हेरिऐंट

नवीन वॅगनआरच्या सात व्हेरिऐंट बाजारात उतरवण्यात येणार आहे. यामध्ये तीन व्हेरिऐंट 1.0 लीटर इंजिन आणि चार व्हेरिऐंट 1.2 लीटर इंजिनमध्ये असतील. तसेच मारुती सुझुकीच्या अरीना डीलरशिपद्वारे या कार विकल्या जातील. या कारची किंमत 4.5 लाख ते 5.5 लाख रुपयांमध्ये असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मार्केटमध्ये या कारची टक्कर नवीन सॅन्ट्रो, टाटा रियागोच्या कारसोबत होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI