WhatsApp : आता लॉगिनसाठी ‘डबल व्हिरिफिकेशन’, सुरक्षा आणखी मजबूत, Undoचं देखील असणार ऑप्शन, जाणून घ्या…

व्हॉट्सअ‍ॅप आता लॉगिन प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी काम करत आहे.

WhatsApp : आता लॉगिनसाठी 'डबल व्हिरिफिकेशन', सुरक्षा आणखी मजबूत, Undoचं देखील असणार ऑप्शन, जाणून घ्या...
WhatsAppImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 9:14 AM

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सध्या आपल्या जीवनातील महत्वाचा भाग झाला आहे. कोणतंही काम असलं की आपण लगेच व्हॉट्सअ‍ॅपचा अपयोग करतो. खरं तर एसएमएस (SMS) सारख्या संदेशासाठी व्हॉट्सअ‍ॅप सुरू करण्यात आलं होतं. मात्र, वेळोवेळी त्यात नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आणि व्हॉट्सअ‍ॅपमधील फीचर्स (whatsapp feature) वाढतच गेले. त्यानंतरत व्हॉट्सअ‍ॅपवर मजकुराव्यतिरिक्त फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट, लोकेशन इत्यादी पाठवता येऊ लागले. एवढेच नाही तर याद्वारे तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना पैसेही पाठवू शकता. अशा परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅप आता लॉगिन प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी काम करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अकाउंट लॉग इन करताना व्हॉट्सअ‍ॅपला अधिकचं संरक्षण देण्याची तयारी सुरू आहे. हे नवीन फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध असेल. हे नवीन फीचर कसं काम करेल याची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

डबल व्हेरिफिकेशन कोड कसा मिळेल?

खरं तर, व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकर WABetaInfoने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, आता युजरला अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी डबल व्हेरिफिकेशन कोड मिळेल. व्हॉट्सअ‍ॅप आता वापरकर्त्यांची सुरक्षा सुधारण्यासाठी आणखी एक फीचर विकसित करत आहे. हे डबल-व्हेरिफिकेशन कोडसाठी विचारत आहे. जेव्हा हे फीचर्स जारी केलं जातं तेव्हा दुसर्‍या डिव्हाइसवरून WhatsApp खात्यात लॉग इन करण्यासाठी अतिरिक्त व्हिरिफिकेशन कोड आवश्यक असेल.

हे सुद्धा वाचा

मोबाइलवर कोड येणार

व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटमधील आपल्या वैयक्तिक तपशीलांचा गैरवापर टाळण्यासाठी डबल व्हेरिफिकेशन कोडसह लॉगिन प्रक्रिया मजबूत करण्यात आली आहे. जेव्हाही तुम्ही नवीन फोनवरून व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग इन कराल तेव्हा चॅट लोड करण्यासाठी आणि बॅकअप घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबरवर सहा अंकी कोड पाठवला जाईल.

दुसरा लॉग इन करेल, अलर्ट

रिपोर्टनुसार, ‘जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटमध्ये लॉग इन करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी होतो. तेव्हा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी 6-अंकी कोड आवश्यक असेल. अशा परिस्थितीत फोन नंबरच्या मालकाला त्यांच्या अकाऊंटवर लॉग इन करण्याच्या प्रयत्नाबद्दल अलर्ट करण्यासाठी दुसरा मॅसेज पाठविला जातो. या प्रकरणात वापरकर्त्याला WhatsApp वरून कळेल की कोणीतरी त्यांच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे.

Undoचा पर्याय असेल व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी Undo चा पर्यायही आणत आहे. यामुळे यूजर्सना चुकून पाठवलेले मॅसेज डिलीट करण्याचा पर्याय मिळेल. लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरील पूर्ववत बटण स्क्रीनच्या खालच्या बाजूला पॉप अप होईल. रिपोर्टनुसार, जेव्हा यूजर डिलीट फॉर मी ऑप्शनवर टॅप करेल, तेव्हा व्हॉट्सअ‍ॅपच्या तळाशी Undo ऑप्शन दिसेल. हे फीचर जीमेलवर काम करते त्याच पद्धतीने काम करेल.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.