खूशखबर ! आता स्मार्टफोन देणार मोतीबिंदूच्या त्रासापासून आराम, जाणून घ्या कसे होईल फायदेशीर

| Updated on: Feb 27, 2021 | 7:09 PM

खूशखबर, आता स्मार्टफोन देणार मोतीबिंदूच्या त्रासापासून आराम, जाणून घ्या कसे होईल फायदेशीर (Now the smartphone will give relief from the eye issues)

खूशखबर ! आता स्मार्टफोन देणार मोतीबिंदूच्या त्रासापासून आराम, जाणून घ्या कसे होईल फायदेशीर
डोळ्यांच्या बुबुळे सांगतात व्यक्तीचा स्वभाव, समुद्रशास्त्रात केला आहे याचा उल्लेख
Follow us on

मुंबई : सामान्यतः नेहमीच स्मार्टफोन हा आरोग्यासाठी हानिकारक मानला जातो. विशेषतः डोळ्यांवर याचे सर्वाधिक दुष्परिणाम होतात. मात्र आता हाच स्मार्टफोन डोळ्यांच्या विविध समस्यांसाठी उपयुक्त ठरु शकतो. डेळ्यांमधील काटबिंदूची सुरवातीची लक्षणे या स्मार्टफोनच्या माध्यमातून शोधली जाऊ शकतात, ज्यामुळे अंधत्व आणि डोळ्याच्या गंभीर समस्या टाळण्यास मदत होते, असा दावा संशोधकांनी केला आहे. (Now the smartphone will give relief from the eye issues)

ग्लुकोमा हा ऑप्टिक सिस्टमचा एक आजार आहे. या आजारामुळे जगभरात 7.96 कोटी लोक त्रस्त आहेत. जर योग्य उपचार केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. ग्लुकोमाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये योग्य उपचार आणि नियंत्रणासह अंधत्व रोखले जाऊ शकते. ग्लुकोमा उच्च स्तराच्या इंट्राओक्युलर प्रेशर (आयओपी) शी संबंधित आहे. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीचा आयओपी अचूकपणे पाळला गेला तर त्याची दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत होते.

साऊंडवेव्ह करू शकतात मदत

मोबाईल मेजरमेंट मेथडसाठी वापरण्यात येणारे साउंडवेव्ह आयओपीची वाढती मात्रा शोधण्यात मदत करतात, ज्यामुळे रोगाचा लवकर शोध घेण्यात मदत होईल आणि त्यानुसार लवकरच त्यावर उपचारही सुरू होतील. अभियांत्रिकी अहवालात प्रकाशित झालेल्या या अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, युकेच्या बर्मिंघम युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी साऊंडवेव्ह आणि एका आय मॉडेलचा उपयोग करून आपला प्रयोग यशस्वीपणे पार पाडला.

काय म्हणाले विद्यापीठाचे संचालक?

विद्यापीठाच्या प्रगत मॅन्युफॅक्चरिंग ग्रुपचे संचालक खामीस एस्सा म्हणाले की, आम्हाला एखाद्या वस्तूचा अंतर्गत दबाव आणि त्यातील ध्वनी प्रतिबिंब गुणांक यांच्यातील संबंध सापडला आहे. डोळ्यांच्या टेक्स्चरचा आणि साउंडवेव्हला मिळालेल्या प्रतिक्रियेचा अभ्यास केल्यावर, आम्हाला आढळले की घरी बसून आयओपी निश्चित करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर केला जाऊ शकतो. (Now the smartphone will give relief from the eye issues)

इतर बातम्या

त्वरा करा ! क्रोमावर खरेदी करा अॅपल प्रोडक्ट, मिळेल 10 टक्के सूट

घरातील कटकटींचा वैताग, आधी लोखंडी रॉडने पत्नीचा खून; नंतर मुलीचाही गळा दाबला