घरातील कटकटींचा वैताग, आधी लोखंडी रॉडने पत्नीचा खून; नंतर मुलीचाही गळा दाबला

या सर्व घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Man Murder Wife And Daughter)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:00 PM, 27 Feb 2021
घरातील कटकटींचा वैताग, आधी लोखंडी रॉडने पत्नीचा खून; नंतर मुलीचाही गळा दाबला
प्रतिकात्मक फोटो

अमृतसर : घरातील रोजच्या भांडणांना कंटाळलेल्या पतीने आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर पतीने स्वत: देखील गळफास घेत आत्महत्या केली आहे. पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी मेहता चौक परिसरात ही घटना घडली. (Man Murder Wife And Daughter after that commit suicide in Punjab Amritsar)

नेमकं प्रकरणं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंदर सिंह हे अमृतसरच्या मेहता चौक परिसरात राहत होते. महिंदर सिंह यांच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांचे पत्नी ज्योतीसोबत नेहमी वाद व्हायचे. या पती-पत्नीचे नेहमी पैशांवरुन वाद होत असे. कालही अशाचप्रकारे महिंदर आणि ज्योतीमध्ये वाद झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की महिंदरने रागाच्या भरात लोखंडाच्या रॉडने ज्योतीच्या डोक्यात घातला. यानंतर त्याने अनेक वेळा तिच्या डोक्यात त्या रॉडने प्रहार केला. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्यांची लहान मुलगी गुरप्रीत आईला वाचवण्यासाठी गेली असता, महिंदरने रागाच्या भरात मुलीचीही गळा दाबून हत्या केली. यानंतर महिंदर याने घरातच गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेचा तपास सुरु

या सर्व घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. (Man Murder Wife And Daughter after that commit suicide in Punjab Amritsar)


संबंधित बातम्या : 

सावधान! ते मुलींना समुद्र किनाऱ्यावर बोलवतात, टच करतात, शूट करतात, मुंबई सायबर सेलकडून भांडाफोड !

नवी मुंबईत दुकानदाराच्या डोळ्यादेखत सोन्याचे दागिने घेवून महिला पसार, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण