नवी मुंबईत दुकानदाराच्या डोळ्यादेखत सोन्याचे दागिने घेवून महिला पसार, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण

भर दिवसा दुकानदाराच्या डोळ्यादेखत ही घटना घडल्याने दुकानदाराला धक्का बसला आहे. तर, संपूर्ण व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहेत (Navi Mumbai Robbery In Jewellery Store).

नवी मुंबईत दुकानदाराच्या डोळ्यादेखत सोन्याचे दागिने घेवून महिला पसार, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण

नवी मुंबई : नवी मुंबईतील तळोजा पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर आणि वर्दळीच्या रस्त्यावर (Navi Mumbai Robbery In Jewellery Store) असलेल्या ज्वेलर्स दुकानातून एका बुरखाधारी महिलेने 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. भर दिवसा दुकानदाराच्या डोळ्यादेखत ही घटना घडल्याने दुकानदाराला धक्का बसला आहे. तर, संपूर्ण व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहेत (Navi Mumbai Robbery In Jewellery Store).

ही घटना तळोजा वसाहतीत बुधवारी (25 फेब्रुवारी) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोजा वसाहती सेक्टर दहामधील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर फ्लोरा इमारतीत कैलाशचंद सोनी यांचे ‘श्रीनाथ’ नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास सोने घेण्याच्या बहाण्याने एक बुरखाधारी महिला दुकानात आली. दागिन्याचे मोल करीत असताना विक्रीसाठी ठेवण्यात आलेले 30 ग्रामची सोनसाखळी घवून तिने पोबारा गेला. दुकाना बाहेर दुचाकी घेवून उभ्या असलेल्या दुचाकी चालकासोबत तिने पळ काढला. या सोन्याची किंमत अंदाजे दीड लाखाच्या घरात असल्याचे समजते (Navi Mumbai Robbery In Jewellery Store).

Navi Mumbai Robbery

Navi Mumbai Robbery

विशेषतः ज्वेलर्सच्या दुकानाला लागून कटरली, मोबाईल शॉप आहे. तर बाहेरच चहा आणि फळ विक्रेते असतात. तसेच दुकाना समोरील रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. तरीही, भर दिवसा एक महिला दागिने घेवून पसार झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी देखील असे प्रकार घडल्याचे नागरिकांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे (Navi Mumbai Robbery In Jewellery Store).

संबंधित बातम्या :

इचलकरंजीत डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, गाडीची तोडफोड, परिसरात तणावाचं वातावरण

ऐकावं ते नवल, हत्येच्या खटल्यात कोंबडा पोलीस कोठडीत, कोर्टासमोरही हजर करणार

आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; कोर्टाकडून 2 मार्चपर्यंत कोठडी

Published On - 1:23 pm, Sat, 27 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI