विसर्जनच्या दिवशीच रचला कट, त्यानंतर अख्खं पुणं हादरलं; घायवळ टोळीच्या दोषारोपत्रात धक्कादायक खुलासा
Pune Crime : घायवळ टोळीतील 9 गुन्हेगारांवर 6455 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोथरुडमधील गणेश विसर्जनाच्या दिवशी गोळीबाराचा कट रचण्यात आला होता. याबाबत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीने शहराच्या विविध भागात अनेक गुन्हे केल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या बहुतांशी भागात सक्रीय असलेल्या या टोळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. अशातच आता निलेश घायवळ टोळीतील 9 गुन्हेगारांवर 6455 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोथरुडमधील गणेश विसर्जनाच्या दिवशी गोळीबाराचा कट रचण्यात आला होता. याबाबत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलीसांच्या विशेष पथकाने सखोल तपास केल्यानंतर पुराव्यांच्या आधारे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुण्यात झाला होता गोळीबार
पुण्यातील कोथरुडमध्ये 17 सप्टेंबर रोजी घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार केला होता. याबाबत तपास करताना पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहे. पुण्यातील कोथरुडमधील शास्त्रीनगर भागात काही दिवसात जोरात धमाका करा, शस्त्रे, पैसे मी पुरवतो आणि केस लागली तर बाहेर काढतो, असे सांगून निलेश घायवळ ने गणेशोत्सव विसर्जन रोजी कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल
पुण्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर घायवळ टोळीतील 9 गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला होता. आता गुन्हे शाखेने 6 हजार 455 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. यात हा कट गणेश विसर्जनाच्या दिवशी रचल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मयुर ऊर्फ राकेश गुलाब कुंबरे, मयंक-मॉन्टी विजय व्यास, गणेश सतिश राऊत, दिनेश राम फाटक, आनंद अनिल चांदलेकर, मुसाब ईलाही शेख, जयेश कृष्णा वाघ, अक्षय दिलीप गोगावळे, अजय महादेव सरोदे या आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
निलेश घायवळ परदेशात पळाला
पुण्यातील ही घटना घडल्यानंतर काही दिवसांनी गँगस्टर निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला होता. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात आली आहे. तसेच त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस ही जारी करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी अटक केलेल्या 9 आरोपीविरुद्ध 12 जानेवारी रोजी दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता या प्रकरणावर सुनावणी पार पडणार असून त्यानंतर आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
