AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीय… देशाबद्दल कोण काय म्हणालं?; प्रजासत्ताक दिनाच्या द्या शुभेच्छा !

26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. यंदा 76 वा गणराज्य दिन साजरा केला जाईल. 26 जानेवारी 1950मध्ये भारताचे संविधान स्वीकारले गेले होते.

मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीय... देशाबद्दल कोण काय म्हणालं?; प्रजासत्ताक दिनाच्या द्या शुभेच्छा !
प्रजासत्ताक दिन
| Edited By: | Updated on: Jan 26, 2025 | 6:00 AM
Share

Republic day wish : दर वर्षी 26 जानेवारीला भारतात प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. यंदाचा 76 वा गणराज्य दिन साजरा केला जाईल. 26 जानेवारी 1950मध्ये भारताचे संविधान स्वीकारले गेले होते. याशिवाय, 26 जानेवारी1930मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश साम्राज्यापासून पूर्ण स्वराज्य घोषित केले होते. म्हणूनच या दिवशी संपूर्ण देशभर गणराज्य दिन साजरा केला जातो. या दिवशी विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गणराज्य दिनाच्या दिवशी दिल्लीतील राजपथावर भारताचे राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.

26 जानेवारीच्या दिवशी संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य आणि अधिकाराची आठवण करून दिली जाते. आजच्या दिवशी आपल्या देशाला संविधान प्राप्त झाले, ज्याने देशाला स्वतंत्र कायदे आणि अधिकार दिले. या दिवशी आपण आपल्या देशातील शहीदांना अभिवादनही केले जाते आणि एकमेकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा देतो.

आपल्या संविधानात असलेल्या स्वाभिमानाची आठवण करून देणारा हा दिवस आहे. आपल्या देशाचा नागरिक म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. 76 व्या गणराज्य दिनाच्या या पवित्र दिवशी, आपल्या सर्वांना या महान देशाचे गौरवशाली संविधान आणि त्याने दिलेल्या अधिकारांची आठवण ठेवून, देशाच्या प्रगतीसाठी काम करायला प्रेरित होऊया. प्रजासत्ताक दिन हा फक्त स्वातंत्र्याचा उत्सव नाही, तर एकता, बंधुता आणि सामूहिक कर्तव्यांचं प्रतिक आहे. या दिवशी आम्ही सर्व देशवासीय एकत्र येऊन आपल्या देशाच्या भविष्यासाठी वचनबद्ध होतो.

स्वातंत्र्याबद्दल महापुरुष काय म्हणाले?

“एका देशाची संस्कृती त्याच्या लोकांच्या हृदयात आणि आत्म्यात वास करते.” – महात्मा गांधी

“मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीय आहे.” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“भारत हे एक राष्ट्र नाही, हे एक उपखंड आहे.” – मोहम्मद अली जिना

“जर मला देशसेवा करताना मृत्यू आला तर मी धन्य होईल. माझे रक्त या देशाच्या प्रगतीसाठी वाहिले जाईल.” – लाल बहादूर शास्त्री

“चला, आपल्याला आपल्या मातृभूमीच्या वारशाचे संरक्षण करण्याचे वचन देऊया.” – अटल बिहारी वाजपेयी

प्रजासत्ताक दिनाच्या द्या शुभेच्छा

देशासाठी जन्म आपुला सेवा आपुले काम, देशासाठी चंदन होऊन झिजो अखंडित प्राण… प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

चला तिरंगा पुन्हा फडकवूया, आपल्या देशासाठी गाऊया, आज आहे प्रजासत्ताक दिन, चला आनंद साजरा करूया प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.