नथिंग्ज सब-ब्रँड CMF ने भारतात लाँच केला हेडफोन प्रो, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
आजकाल प्रत्येकजण ब्रँड नुसार हेडफोन वापरत असतो. अशातच तुम्हालाही उत्तम क्वॉलिटीचा आणि योग्य दरात होडफोन खरेदी करायचा असेल तर CMF हेडफोन प्रो हा हेडफोन भारतात लाँच झाला आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या हेडफोनची किंमत आणि फिचर्सबद्दल जाणून घेऊयात.

CMF हेडफोन प्रो ची भारतात किंमत 7 हजार 999 रूपये आहे. तथापि कंपनी 20 जानेवारीपासून मर्यादित काळासाठी 6 हजार 999 रूपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ते विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. हे हेडफोन फ्लिपकार्ट आणि निवडक ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध असतील. तुम्हाला हे हेडफोन्स गडद राखाडी, हलका हिरवा आणि हलका राखाडी रंगांमध्ये खरेदी करता येईल.
CMF हेडफोन प्रो ची फिचर्स आणि स्पेसिफिकेशन
हेडफोन्स ANC किंवा अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनला सपोर्ट करतात. CMF चे म्हणणे आहे की हेडफोन प्रो हा ANC सह येणारा त्यांचा पहिला ओव्हर-इअर वायरलेस हेडफोन आहे. यात 40 मिमी निकेल-प्लेटेड ड्रायव्हर्स आहेत. हे हायब्रिड अॅडॉप्टिव्ह ANC ला सपोर्ट करते, जे 40dB पर्यंत अॅम्बियंट नॉइज कमी करू शकते. चांगल्या आवाजासाठी यामध्ये सिनेमा आणि कॉन्सर्ट सारखे स्पेशियल ऑडिओ मोड देखील देते. तसेच हे स्मार्ट हेडफोन्स LDAC आणि हाय-रेझ ऑडिओला देखील सपोर्ट करते.
डिझाइन आणि कंट्रोल सिस्टम
CMF हेडफोन प्रो मध्ये पारदर्शक आणि मॉड्यूलर डिझाइन आहे. तसेच यामध्ये टच कंट्रोल्सऐवजी फिजिकल बटणे देण्यात आले आहे. या हेडफोनचे तुम्ही इअर कुशन देखील सहज बदलू शकता. हेडफोन्समध्ये व्हॉल्यूम आणि प्लेबॅक कंट्रोलसाठी रोलर डायल आहेत. एनर्जी स्लायडर बास आणि ट्रेबल एडजस्ट करू शकता आणि त्यासोबत एक कस्टमाइझ करण्यायोग्य बटण देखील प्रदान केले आहे. ही सर्व कंट्रोल सिस्टम आणि साउंड प्रोफाइल नथिंग एक्स अॅपद्वारे सेट करता येतात. यात एक वैयक्तिक साउंड फिचर देखील आहे जे तुमच्या ऐकण्याच्या शक्तीनुसार ऑडिओ ट्यून करते.
बॅटरी आणि चार्जिंग
CMF हेडफोन प्रो ANC शिवाय 100 तासांपर्यंत आणि ANC चालू असताना अंदाजे 50 तासांपर्यंत चालू शकतो. हे USB टाइप-सी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या मते फक्त 5 मिनिटांच्या चार्जिंगमुळे ANC शिवाय 8 तासांपर्यंत संगीत मिळू शकते. पूर्ण चार्ज करण्यासाठी दोन तासांपेक्षा कमी वेळ लागतो. अशातच खास गोष्ट म्हणजे तुम्ही मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी लागणाऱ्या टाइप-सी केबलद्वारे देखील हे हेडफोन्स चार्ज केले जाऊ शकते.
