AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी पैशात महागड्या फोनची मजा, Apple चा सेल्फी स्पेशल iPhone लवकरच येणार

हा फोन ब्लॅक आणि व्हाईट सारख्या क्लासिक ऑप्शनसोबत लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनचे प्रोडक्शन सुरु झाले आहे. म्हणजे हा फोन लवकरच बाजारात दाखल होणार आहे.

कमी पैशात महागड्या फोनची मजा, Apple चा सेल्फी स्पेशल iPhone लवकरच येणार
Apple iPhone 17e launch in Feb
| Updated on: Jan 18, 2026 | 7:33 PM
Share

iPhone 17e : Apple च्या आयफोनची क्रेज प्रचंड आहे. परंतू प्रत्येक जण हा महागडा फोन आपल्या खिशात बाळगू शकत नाही. अशात आता Apple कंपनी अशा ग्राहकांना नजरेसमोर ठेवून आपली बजेट सिरीजला रिफ्रेश करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत कंपनीने iPhone 16e सादर केला होता. आता याला मिळालेल्या यशामुळे iPhone 17e संदर्भात चर्चेचा बाजार गरम आहे. आतल्या बातमीनुसार iPhone 17e चे मास प्रोडक्शन सुरु आहे.

डिस्प्लेत बदल केला

यावेळी सर्वात मोठा बदल फोनच्या स्क्रीनचा पाहायला मिळू शकतो. बातमीनुसार दावा आहे की iPhone 17e मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले असणार आहे. या फोनमध्ये गेल्या अनेक मोबाईल मॉडेलहून खास अशा ‘डायनामिक आयलँड’चा समावेश आहे. आतापर्यंत डायनामिक आयलँडचे फिचर केवळ महागड्या आणि फ्लॅगशिप मॉडेलपर्यंत मर्यादित होता. परंतू आता iPhone 17e सोबत Apple याला आपल्या एण्ट्री लेव्हल फोनमध्येही आणत आहे.डिस्प्ले पॅनलसाठी कंपनी BOE, सॅमसंग आणि LG सारख्या मोठ्या सप्लायर्सची मदत घेत आहे. म्हणजे स्क्रीनची क्लॉलिटीत कोणतीही कमतरता राहू नये.

फ्लॅगशिप फोन सारखा परफॉर्मेंस

फ्लॅगशिप iPhone 17 सीरीजमध्ये जो A19 चिपसेट वापरला होता तोच आता iPhone 17e मध्ये वापरला जाणार आहे. हा फोन iOS 26 वर आधारित ‘ Apple इन्टेलिजन्स’ फीचर्सला सपोर्ट करणार आहे. म्हणजे कमी किंमतीत एआय (AI) आणि लेटेस्ट सॉफ्टवेअरचा संपूर्ण अुनभव युजरना घेता येणार आहे.

कॅमरा सेटअपमध्ये बदल नाही

रिअर कॅमेरा सेटअपमध्ये जास्त बदल होण्याची शक्यता नाही . यात गेल्या मॉडेस सारखी सिंगल 48MP चा सेंसर मिळू शकतो. खास बाब म्हणजे या कॅमेऱ्याचा फ्रंट कॅमेरा अपग्रेट करुन ‘सेंटर स्टेज’ फिचर 18MP चा केला जाणार असल्याने सेल्फी प्रेमीसाठी खास धमाल असणार आहे.हा तोच कॅमेरा सिस्टीम आहे जी iPhone 17 सीरीजमध्ये पाहायला मिळाली होती.

iPhone 16e च्या वापरकर्त्यांची एक मोठी तक्रार होती की त्यात वायरलेस चार्जिंगची कमतरता आहे. लिक झालेल्या बातमीनुसार आता Apple कंपनीने यास मनावर घेतले आहे. त्यामुळे iPhone 17e मध्ये MagSafe चार्जिंगची सुविधा मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच कनेक्टीव्हीटीसाठी Apple स्वत:च्या C1 वा C1x मॉडेमचा वापर करु शकतो,जी क्वालकॉम मॉडेमची जागा घेणार आहे.

किंमत किती असणार ?

iPhone 17e ची किंमत सुमारे 59,900 रुपयांच्या आसपास जाऊ शकते. हीच तिच किंमत आहे ज्यात गेले मॉडेल लाँच झाले होते. म्हणजे अपग्रेड्स असूनही कंपनीने किंमती स्थिर ठेवली आहे. मेमरी चिप्सच्या वाढत्या किंमतीमुळे या फोनची अंतिम किंमत कदाचित वाढूही देखील शकते. हा फोन ब्लॅक आणि व्हाईट सारख्या क्लासिक ऑप्शनसोबत लाँच होण्याची शक्यता आहे .या फोनचे प्रोडक्शन सुरु देखील झाले आहे. म्हणजे हा फोन फेब्रुवारीच्या दरम्यान लाँच होऊ शकतो.

जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा.
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका.
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश.
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर.
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?.
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स.
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न.
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान.
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?.
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल.