Republic Day: अक्षय कुमार ते अनुष्का शर्मा.. या सेलिब्रिटींचं भारतीय सैन्याशी तगडं कनेक्शन
भारतीय लष्कराच्या शौर्याचे किस्से आपण अनेकदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहतो. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी मोठ्या पडद्यावर सैनिकाची भूमिका साकारून आपलं स्वप्न पूर्ण केलंय. पण इंडस्ट्रीत असेही काही कलाकार आहेत ज्यांचं खऱ्या आयुष्यातही लष्कराशी संबंध आहेत.

देशसेवा करणाऱ्या, देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या कहाण्यांनी आपल्याला नेहमीच प्रेरणा दिली. या कथा केवळ रणांगणापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर बॉलिवूडनेही या कथांपासून प्रेरित होऊन अनेक दमदार चित्रपट बनवले आहेत. अक्षय कुमारपासून हृतिक रोशनपर्यंत अनेक कलाकारांनी मोठ्या पडद्यावर सैनिकाची भूमिका साकारून देशभक्ती दाखवून दिली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, यातील काही कलाकारांचं लष्कराशी खास नातंसुद्धा आहे. कारण त्यांचं कुटुंब लष्कराशी संबंधित आहे.
अक्षय कुमार- बॉलिवूडचा ‘खिलाडी नंबर वन’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार याचे वडील हरिओम भाटिया हे भारतीय लष्कराचे प्रसिद्ध सैनिक होते. ते पंजाबमधील अमृतसर इथल्या रेजिमेंटमध्ये तैनात होते. अक्षय कुमारला त्याच्या वडिलांकडून शिस्तीचे धडे मिळाले आहेत.
सेलिना जेटली- अभिनेत्री सेलिना जेटलीचंही लष्कराशी घट्ट नातं आहे. माजी मिस इंडिया ठरलेल्या या अभिनेत्रीचे वडील भारतीय लष्करात कर्नल होते. सेलिनाच्या आईने भारतीय सैन्यात परिचारिका म्हणून काम केलंय आणि तिचा भाऊसुद्धा सैन्यात आहे.
View this post on Instagram
सुष्मिता सेन- माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेनचे वडील शुभीर सेन हे भारतीय वायुसेनेशी संबंधित होते. ते हवाई दलात विंग कमांडरती जबाबदारी सांभाळत होते. तिचे वडील लष्करात असल्याने सुष्मिताने एअर फोर्स स्कूलमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं.
View this post on Instagram
प्रियांका चोप्रा- बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचे आई आणि वडील दोघंही लष्कराशी संबंधित होते. प्रियांकाचे वडील डॉ. अशोक चोप्रा आणि आई डॉ. मधु चोप्रा सैन्यात डॉक्टर होते.
अनुष्का शर्मा- अभिनेत्री आणि क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचे वडील अजय कुमार सैन्यात कर्नल होते. 26 वर्षांपूर्वी 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात ते सहभागी होते. अनुष्कानेही आर्मी स्कूलमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलंय.
View this post on Instagram
लाता दत्ता- अभिनेत्री लारा दत्ताचे वडील आणि तिच्या दोन्ही बहिणी हवाई दलात होते. तिचे वडील हवाई दलात विंग कमांडर होते आणि तिच्या दोन्ही बहिणीसुद्धा भारतीय हवाई दलात कार्यरत आहेत.
